विकासकामासाठी पाठपुरावा करणे गरजेचे : संदीप मांडवे

गावच्या विकासासाठी गावातील सर्व ग्रामस्थांची एकजूट महत्त्वाची असून, गावचा विकास साधायचा असेल तर विकासकामांसाठी गावातील ग्रामस्थांनी पाठपुरावा करणे महत्वाचा विषय असतो, असे मत खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे (Sandip Mandve) यांनी व्यक्त केले.

    वडूज : गावच्या विकासासाठी गावातील सर्व ग्रामस्थांची एकजूट महत्त्वाची असून, गावचा विकास साधायचा असेल तर विकासकामांसाठी गावातील ग्रामस्थांनी पाठपुरावा करणे महत्वाचा विषय असतो, असे मत खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे (Sandip Mandve) यांनी व्यक्त केले.

    भुरकवडी (ता.खटाव) येथे मंजूर झालेल्या १५ वित्त आयोग पंचायत समिती स्तर बंधित निधीतून पंचायत समिती सदस्य संदीप मांडवे यांच्या शेष फंडातून पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा विहिरी जवळील पंप हाऊसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच ललिता कदम, माजी सरपंच शिवाजीराव कदम, एस. के. कदम, चेअरमन दिलीप कदम, शरदराव कदम, युवा नेते मनोज कदम, छगनराव कदम, सुखदेव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

    मांडवे पुढे म्हणाले की, भुरकवडी ग्रामस्थांनी एकजुुटीतून सलग सहा वेळा ग्रामपंचायत व सोसायटी निवडणूक ही बिनविरोध करून तालुक्यातील इतर गावासमोर आदर्श निर्माण केला आहे. गावच्या विकास कामासाठी सर्व ग्रामस्थांची एकी महत्त्वाची असून, गावच्या विकासकामांसाठी पाठपुरावा केल्यानंतर गावचा विकास नक्कीच होतो आणि याबाबतीत भुरकवडी हे गाव तरबेज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.