‘माळशिरस मॉडेल’ राज्यभर राबविण्याची गरज : जयंत पाटील

माळशिरस तालुक्यातील अनेक पाझर तलावांचे साठवण तलावात केलेले रूपांतर व जलसंधारण विभागाकडून होत असलेल्या कामांचे कौतुक करत जलसंधारणच्या या कामाचे 'माळशिरस मॉडेल' राज्यभर राबविण्याची गरज असून, लवकरच याबाबतीत जलसंधारणमंत्री व अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली.

    अकलूज : माळशिरस तालुक्यातील अनेक पाझर तलावांचे साठवण तलावात केलेले रूपांतर व जलसंधारण विभागाकडून होत असलेल्या कामांचे कौतुक करत जलसंधारणच्या या कामाचे ‘माळशिरस मॉडेल’ राज्यभर राबविण्याची गरज असून, लवकरच याबाबतीत जलसंधारणमंत्री व अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी गारवाड मगरवाडी येथील शेतकऱ्यांशी सवांद साधताना दिली.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर यांनी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून माळशिरस तालुक्यातील १७ तलावांच्या कामांसाठी भरीव निधी आणला होता अजून 13 तलावाच्या कामाची मंजुरी मिळणार आहे. यांपैकी अनेक कामे पूर्वत्वास गेली असून, या कामांची व तलावांची पाहणी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी (दि.११) दुपारपासून रात्री उशिरापर्यंत केली. त्यानंतर त्यांनी गारवाड मगरवाडी, सुळेवाडी, चांदापुरी, पठाणवस्ती, पिलीव येथिल दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद त्यांनी साधला.

    यावेळी गारवाड येथे शेतकऱ्यांशी सवांद करताना पाटील पुढे म्हणाले, पीडीएन (बंद पाईपलाईन) द्वारे तलावातून थेट शेतकर्यांनाच्या शेतीत पाणी देण्याची उत्तमराव जानकर यांची कल्पना उत्कृष्ट असून, यामुळे पाण्याच्या अपव्यय टाळला जाईल व शेतकऱ्यांचा मोठा प्रमाणात फायदा होईल. माळशिरस तालुक्यातील 20 ते 22 गावे दुष्काळी पट्ट्यातील असून, ती गावे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने त्या गावांना शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी उपलब्धता व्हावी.