waste water recycling in kalyan

कल्याण डोंबिवली (Kalyan Dombivali) शहरातील वाढता शहरीकरणाचा वेग पाहता, पाण्याची वाढती गरज पाहता, पाणी वापराची पद्धत बदलली पाहिजे. उपलब्ध पाण्याचे सुनियोजिन करून, पाणी टंचाई, खालावलेली भुजल पातळीची समस्या यावर मात करण्यासाठी सोमनाथ सोसायटीतील पदाधिकारी आणि रहिवाशांनी एकत्र येऊन प्लँटसाठी पुढाकार घेतला.

    कल्याण: कल्याणमधील (पश्चिम) (Kalyan) वाडेघर परिसरातील एका सोयासटीने पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी एक उपाय केला आहे. नीळकंठ कॉम्प्लेक्समधील सोमनाथ सोसायटीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगसह (Rain Water Harvesting) वेस्ट वॉटर रिसायकलिंगचा प्लँट (Waste Water Recycling Plant) उभारला आहे. कल्याणमध्ये पहिल्यांदाच एखाद्या सोसायटीने अशा प्रकारचा प्लँट उभारला आहे.

    कल्याण डोंबिवली शहरातील वाढता शहरीकरणाचा वेग पाहता, पाण्याची वाढती गरज पाहता, पाणी वापराची पद्धत बदलली पाहिजे. उपलब्ध पाण्याचे सुनियोजिन करून, पाणी टंचाई, खालावलेली भुजल पातळीची समस्या यावर मात करण्यासाठी सोमनाथ सोसायटीतील पदाधिकारी आणि रहिवाशांनी एकत्र येऊन प्लँटसाठी पुढाकार घेतला. गेल्या ४ वर्षात सुमारे २५०० टँकर पाणी टंचाईमुळे विकत आणायला लागल्याने पदाधिकारी जगन रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येत सुमारे साडेतीन लाखांचा निधी सोसायटी रहिवाशांकडून जमा करीत वेस्ट वॉटर रिसायकलिंग प्लँटसह रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प साकरत आपली पाणी टंचाई समस्या मार्गी लावली आहे.

    या प्रकल्पात पंपसह फिल्टर प्लँटला ९५,०००,मजुरीसह प्लंबिंग मटेरियलसाठी ११००००,पावसाच्या पाण्याच्या वापरासाठी- १) मजुरांसह फक्त प्लंबिंग – ४५०००. यंत्रणेचे काम – १) वेस्ट वॉटर रिसायकलिंग प्लँट – प्लंबिंगचे काम करून सर्व ८० फ्लॅट्सचे बाथरूम ड्रेन पाईप १०,००० लिटर्स स्टोरेज टाकीशी जोडलेले आहे, तेच वाळू आणि कार्बन फिल्टर असलेल्या फिल्टर युनिटला जोडलेले आहे जे साठवलेले पाणी फिल्टर करते आणि फ्लश टाकीला पाठवते.
    २) पावसाच्या पाण्याचा वापर – सर्व टेरेस रेन वॉटर पाईप जोडलेले आहेत आणि ते फ्लश वॉटर टँकवर पाठवले आहेत जेणेकरुन पावसाळ्यात पावसाचे पाणी कोणत्याही खर्चाशिवाय फ्लशमध्ये वापरले जाईल. सोसायटीने ब्राँईट इंजिनिअरींगच्या माध्यमातून उभारलेल्या वेस्ट वॉटर रिसायकलिंग प्लँट, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचा शुभारंभ आमदार विश्वनाथ भोईर, अनिल पाटील, माजी नगरसेवक सुनील वायले, माजी नगरसेवक जयवंत भोईर, अनिल पाटील, जगन रेड्डी, डॉ. धीरज पाटील, भामरे, स्थानिक रहिवाशी यांच्या उपस्थितीत रविवारी संध्याकाळी संपन्न झाला.

    याप्रसंगी आमदार विश्वनाथ भोईर यांनी सोमनाथ सोसयटीतील रहिवाशांनी साकारलेल्या, पाणी टंचाईवर केलेल्या उपाययोजनेच्या कामाचे कौतुक करीत इतर सोसयटींनीदेखील आदर्श घेत पाणी बचतीसाठी कटीबद्ध राहणे गरजेचे असल्याचे सागंत सार्वजनिक क्रार्यक्रम प्रसंगी सोमनाथ सोसायटीच्या पदाधिकारीऱ्यांचा सत्कार करणार असल्याचे सांगितले.