जिल्हा उपनिबंधक भोळे यांचे दुर्लक्ष ; जिल्ह्यातील ३६५ सहकारी संस्था अवसायानात

    शेखर गोतसुर्वे, सोलापूर : जिल्ह्यात जवळपास ३६५ सहकारी संस्था अवसायानात काढण्यात आले आहेत. परंतु अनेक सहकारी संस्थावर अवसायिक नेमणूक करण्यात आली नसल्यामुळे या संस्थांचा कारभार सध्या वाऱ्यावर आहे. याकडे जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे हे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सहकारी संस्थांमधून उपस्थित होत आहे.
    सलग तीन वर्षे लेखापरीक्षण न करणे, प्रत्येक वर्षी संस्थेचा नफा तोटा ताळेबंद पत्रक निबंधकांकडे • सादर न करणे, निवडणूक न घेणे यासह इतर कारणांमुळे सोलापूर जिल्ह्यातील जवळपास ३६५ सहकारी संस्था अवसायानात काढण्यात आल्या आहेत.
    अवसायानात काढलेल्या संस्थांमध्ये सर्वाधिक बँका, पतसंस्था, औद्योगिक प्रक्रिया व इतर सहकारी संस्थांचा समावेश आहे. अनेक हौशेनौशांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकाळात सहकारी संस्था काढल्या. मात्र, त्यांना या संस्था चालविणे कठीण झाल्याने त्या अवसायानात काढण्यात आल्या आहेत. यातील सर्वाधिक औद्योगिक संस्था या केवळ नामधारीच होत्या. अवसायानातील संस्थांचा कारभार सध्या अवसायक सांभाळत आहेत. या संस्था सध्या प्रशासक पाहात असल्याने संस्थेचा कारभार पाहून

    अवसायानात काढलेल्या संस्था

    बँका ७

    पतसंस्था १६
    औद्योगिक संस्था ५१

    इतर.. २९१

    एकूण ३६५

    या संस्थांची नोंदणी रद्द होण्याच्या मार्गावर आहे. संस्थेचे ताळेबंद पत्रक आणि सलग तीन ते चार वर्षे लेखापरीक्षण करून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे या संस्था अवसायानात काढण्यात आले आहेत

    सर्वेक्षणानंतर आणखी संस्था अवसायानात

    सध्या सहकार विभागाकडून सर्वेक्षण सुरू असून ज्या संस्था केवळ नावालाच आहेत, ऑडिट करीत नाहीत, निवडणुका घेत नाहीत, ताळेबंद पत्रक सादर करीत नाहीत, अशा संस्थांचे सर्वेक्षण करून त्या संस्था अवसायानात काढण्यात येणार आहेत.

    कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. मात्र, एकाही संस्थेने कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे या संस्थांची नोंदणी आता रद्द होणार आहे.

    या संस्था आता अवसायानात काढल्याने काहींचे संचालक मंडळ करण्यात आले, तर काहींवर सरकारी लेखापरीक्षक अथवा सहकार खात्यातील कर्मचाऱ्यांना अवसायक म्हणून नेमण्यात आले आहे. एका अवसायाकाकडे जवळपास २० ते २५ संस्था देण्यात आल्या आहेत. अवसायानात काढलेल्या या संस्थांना आहे.