Thrill of two murders in the district! The father killed his son for money

पोलिसांनी काकडेंचा भाचा एकनाथ बंडू जाधव याला अटक केली होती. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर देत असल्याने पोलिसांचा संशय आणखी बळावला आणि त्यांनी पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने कबूल देखील केला

    नांदेड : मामा किंवा आत्याच्या मुला- मुलीसोबत लग्न होण ही महाराष्ट्रात फार साधारण बाब आहे. मात्र, मामाने आपली मुलही भाच्याला देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भाच्याने चक्क मामाचाच खून केल्याची घटना घडली आहे. नादेंडमधील या हत्याकांडामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

    अर्धापूर तालुक्यातील चाभरा येथे 9 सप्टेंबरला बालाजी काकडे यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलीस तपास सुरू होता. या प्रकरणी कुटुंबियांची कसून चौकशी केली जात होती. पोलिसांनी काकडेंचा भाचा एकनाथ बंडू जाधव याला अटक केली होती. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर देत असल्याने पोलिसांचा संशय आणखी बळावला आणि त्यांनी पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने कबूल देखील केला. कुऱ्हाडीने वार करत त्यानेच मामाची हत्या केल्याचं सांगितलं.