नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

इंग्रजी ही जागतिक भाषा असली तर अनेक प्रगत देशात मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते, यामुळेच मातृभाषेतूनच शिक्षण दिले पाहिजे, यामुळे विद्यार्थांचा सर्वांगीण विकास होईल असे प्रतिपादन शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले. देशातील सर्वात साक्षर राज्य केरळ आहे तेथील अभ्यासक्रमाचा व शिक्षण पध्दतीचा अभ्यास केला.

  मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नवे शैक्षणिक धोरण देशात राबविण्याची योजना आखली यामुळे लवकरच शैक्षणिक क्षेत्रात क्रांती होईल, असा आत्मविश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मातृभाषेतून शिक्षण झाले तर ते विद्यार्थी ते ज्ञान लवकर आत्मसात करतो, यामुळेच मातृभाषेतून शिक्षण झाले पाहिजे ही संकल्पना नव्या शैक्षणिक (Education) धोरणात आहे असे ते म्हणाले. रशिया या प्रगत देशात रशियन भाषेतच शिक्षण दिले जाते. फ्रान्समध्ये फ्रान्स भाषेत, चीनमध्ये चायनीज भाषेत, जपानमध्ये जापनीज भाषा वापरली जाते. (In France in French, in China in Chinese, in Japan)

  इंग्रजी ही जागतिक भाषा असली तर अनेक प्रगत देशात मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते, यामुळेच मातृभाषेतूनच शिक्षण दिले पाहिजे, यामुळे विद्यार्थांचा सर्वांगीण विकास होईल असे प्रतिपादन शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केले. देशातील सर्वात साक्षर राज्य केरळ आहे तेथील अभ्यासक्रमाचा व शिक्षण पध्दतीचा अभ्यास केला. व तशा प्रकारची शिक्षण पध्दती राबविण्याचा अभ्यास करून राज्यातील शैक्षणिक धोरण राबविले जाणार असल्याचे सुतोवाच शिक्षण मंत्र्यांनी केले.

  पंजाब, राजस्थान व केरळ मॉडेल शिक्षण पद्धती

  शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, संपूर्ण देशातील अशी जी काही राज्य आहेत,ज्यांनी शिक्षणात प्रगती केली आहे त्यांचं नाव आहे, अशा राज्यात आमच्या शिक्षणामध्ये विभागाने दौरे केले. त्यात पंजाब, केरळ व राजस्थानमधून सुद्धा आम्ही मॉडेल घेणार आहोत, विद्यार्थी फोकस सुधारणा आम्ही राज्यात करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

  पुस्तकाला वह्या जोडणार 

  शालेय विद्यार्थी म्हणजे शाळा, दप्तर, वह्या पुस्तके यामध्ये बदल होणार आहे, यापुढे राज्यातील विद्यार्थ्यांच्या पुस्तकाला वह्यांची पानं जोडली जाणार आहेत. पुढील वर्षीपासून अशी पुस्तकं आणि त्याला वह्यांची पानं जोडली जातील. प्रत्येक पुस्तक तीन भागात म्हणजे घटक चाचणी व सत्र परीक्षा भागले जाईल. म्हणजे तीन महिन्याला पुस्तक बदलावा लागेल. याच विभागलेल्या पुस्तकाला वह्यांची पानं असतील. त्यामुळे विद्यार्थी सुद्धा झालेला अभ्यास त्याचं वह्यांच्या पानावर लिहतील, अशी योजना असल्याचं केसरकर यांनी सांगितलं.

  विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी उचललेल्या पावलाचे हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील शाळेतील वरीष्ठ शिक्षक जितेन्द्र महाजनसर यांनी स्वागत केले आहे. नवे शैक्षणिक धोरण देशात नवी शैक्षणिक क्रांती घडवेल व शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल घडवून आणेल असे क्रीडा शिक्षक विजय अवसरमोल सरांनी सांगितले. नव्या शिक्षण धोरणात कौशल्य विकासावर भर देण्यात आल्यामुळे कुशल मनुष्यबळ निर्माण होईल, अशी आशा ग्रंथपाल आरती शर्मा यांनी व्यक्त केले आहे.