अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणात सापडलेत नवे पुरावे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

सुमारे तीन वर्षांपूर्वी, कोरोना काळ सुरु झालेला असतानाच अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्युच्या बातमीनं देशात एकच खळबळ उडाली होती. सुशांतसिंहच्या अचानक जाण्यामुळं त्याचे कुटुंबीय आणि फॅन्स दोघांनाही मोठा धक्का बसला होता. या प्रकरणावर मोठं राजकारणही झालं. सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput Suicide Case) यानं आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.

  मुंबई : सुमारे तीन वर्षांपूर्वी, कोरोना काळ सुरु झालेला असतानाच अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्युच्या बातमीनं देशात एकच खळबळ उडाली होती. सुशांतसिंहच्या अचानक जाण्यामुळं त्याचे कुटुंबीय आणि फॅन्स दोघांनाही मोठा धक्का बसला होता. या प्रकरणावर मोठं राजकारणही झालं. सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput Suicide Case) यानं आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता.

  या प्रकरणात सीबीआय चौकशीही करण्यात येतेय. मात्र, अद्याप काहीही यातून काहीही बाहेर आलेलं नाही. सीबीआयनं या प्रकरणात अद्यापपर्यंत आरोपपत्रही दाखल केलेलं नाही. अशातच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणात नवी माहिती दिली आहे.

  सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात नवे पुरावे हाती आल्याचा दावा

  देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी नवे पुरावे हाती लागल्याचं सांगितलं आहे. सुरुवातीची उपलब्ध असलेली झालेली माहिती ही अफवांच्या आधारावर होती, असं ते म्हणाले. त्यानंतर काही जणांनी त्यांच्याकडे आवश्यक ते पुरावे असल्याचं सांगितलं होतं. त्या लोकांशी संपर्क करण्यात आला आणि त्यांच्याकडे असलेले पुरावे पोलिसांना द्यावेत असं सांगण्यात आलं. या मिळालेल्या पुराव्यांची विश्वसनीयता तपासण्याचं काम सध्या पोलीस करीत आहेत, चौकशी अजून सुरु आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणात कुठलंही भाष्य करणं ही घाई ठरेल, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

  रिया चक्रवर्ती आली होती अडचणीत

  सुशांतचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळी तो आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हे रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर च्यावर आरोप करण्यात आले. नशा करणारे पदार्थ विकत घेण्याच्या प्रकरणात तिला महिनाभर तुरुंगवासही सहन कारावा लागला. त्यानंतर एनसीबीकडे याबाबतचे पुरेसे पुरावे नसल्याचं कोर्टानं म्हटलंय. सुशांतच्या बहिणी आणि कुटुंबीय अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत.