मायणी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी संदीप कुंभार तर उपाध्यक्षपदी नाना चव्हाण यांची निवड

मायणी (ता.खटाव) येथील मायणी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संदीप कुंभार, उपाध्यक्षपदी तानाजी चव्हाण तर सचिवपदी अंकुश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

    मायणी / मारुती पवार : मायणी (ता.खटाव) येथील मायणी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संदीप कुंभार, उपाध्यक्षपदी तानाजी चव्हाण तर सचिवपदी अंकुश चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

    मायणी पत्रकार संघ हा मायणी व परिसरात विधायक कार्यक्रमांना प्राधान्य देतो. पत्रकार संघाच्या माध्यमातून कोरोना काळात अन्नधान्य वाटप, गरजूंना वैद्यकिय सुविधा उपलब्ध करुन देणे, गुणवत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा,व्याख्यानमाला यासह अनेक सामाजिक बांधिलकीनी काम करतो. या कार्याची दखल घेत मायणी ग्रामपंचायतीकडून सन २०२३ मध्ये मायणी पत्रकार संघास नूतन कार्यालय पत्रकारांना देण्यात आले.

    नुकतीच मायणी पत्रकार संघाची बाजार पटांगणावरील पत्रकार भवनात बैठक खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश सुरमुख व मायणी पत्रकार अध्यक्ष अंकुश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सन २०२४ ची नूतन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी लोकमतचे संदीप कुंभार, उपाध्यक्षपदी सत्यसह्याद्रीचे तानाजी चव्हाण, कार्याध्यक्षपदी पुण्यनगरीचे प्रकाश सुरमुख, सचिवपदी सकाळचे बातमीदार अंकुश चव्हाण, सल्लागारपदी जनमतचे मारुती पवार, डिजिटल मीडियाप्रमुख महेश तांबवेकर, खजिनदरपदी प्रभातचे महेश जाधव, सहसचिवपदी मुक्तागिरीचे स्वप्नील कांबळे, निमंत्रित सदस्य म्हणून पुढारीचे पोपट मिंड व सदस्य म्हणून तरुण भारतचे दत्ता कोळी यांची निवड करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.