जुगाराची नवी पद्धत, पुण्यात फिरता जुगार, पोलीसांच्या ससेमिऱ्यानंतर जुगार चालकांच्या क्लृप्त्या

पोलीस कारवाईचा ससेमिरा पाठिमागे लागल्याने पुण्यासारख्या शहरात जुगाराची नवीन पद्धत सुरू झाली असून, जुगारवाले आता फिरता जुगार चालवित आहेत. फिरता जुगार म्हणजेच, एका ठिकाणी न बसता परिसरात फिरून आणि दुचाकींवर बसून हा जुगार घेतला जातो. जेणेकरून पोलीसांच्या लक्षात जुगाराच प्रकरण लक्षात येऊ नये. गेल्या काही दिवसांतील कारवाईतून हे स्पष्ट झाले आहे.

  पुणे : पोलीस कारवाईचा ससेमिरा पाठिमागे लागल्याने पुण्यासारख्या शहरात जुगाराची नवीन पद्धत सुरू झाली असून, जुगारवाले आता फिरता जुगार चालवित आहेत. फिरता जुगार म्हणजेच, एका ठिकाणी न बसता परिसरात फिरून आणि दुचाकींवर बसून हा जुगार घेतला जातो. जेणेकरून पोलीसांच्या लक्षात जुगाराच प्रकरण लक्षात येऊ नये. गेल्या काही दिवसांतील कारवाईतून हे स्पष्ट झाले आहे.

  परंतु, सध्या सासूच्या खंबऱ्यांची नजर त्याहून तीक्ष्ण झाल्याने या धंद्यावर कारवाई होऊ लागल्याने स्थानिक पोलीस अन अवैध धंदेवाले धास्तावलेले आहेत. नुकतीच मध्यवस्थी मधील कुख्यात गुन्हेगार अमोल आंदेकर यांच्या जुगार अड्यावर कारवाई करण्यात आली. त्यातही हे दिसून आले आहे.
  याप्रकरणी दुचाकीवर बसून मटका घेणारे रायटर राजेश मधुकर शेळके (वय ४२) शंतनु विजय पंडित (वय ३१), गजानन राम महाडीक (वय ३०), परशुराम भिकाजी कांबळे (वय ५१) यांच्यासह शेडमध्ये मटका घेमारे रायटर रिचर्ड अँथनी डिसूझा (वय ४३) आणि उमेश नानाजी चौधरी (वय ४७) यांना अटक केली आहे. तर, जुगार अड्डा मालक अमोल बाळासाहेब आंदेकर (वय ४५, रा. गुरुवार पेठ) आणि मनोज ढावरे यांच्यासह इतर फरार आहेत.

  सोमवारी रात्री गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा कारवाई केली. हा जुगार गुरुवार पेठेतील फुलवाला चौकाजवळील गौरी आळीतील एका इमारीत्या पाठिमागे पत्र्याच्या शेडमध्ये व बाहेरच दुचाकींवर बसून घेतला जात होता. पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांना जुगाराबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर तत्काळ त्यावर कारवाई करण्यात आली. कारवाईत तब्बल २३ जणांचा समावेश असून, पावणे तीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे.

  शहरातील अवैध धंद्यावर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता तसेच सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने सध्या सामाजिक सुरक्षा विभाग जोरदार कारवाई करत असल्याचे दिसत आहे. दररोज बड्या-बड्या जुगार अड्यांवर कारवाई सुरू आहे. गेल्या काही दिवसांत सामाजिक सुरक्षा विभागाने २५ मोठ्या जुगारांवर छापे टाकले आहेत. त्यातील बऱ्याच जुगार अड्यावर फिरता जुगार सुरू असल्याचे लक्षात आले आहे. नव्या जुगार पद्धतीची पोलीस दलासह शहरभर चर्चा सुरू आहे.

  नव्या पद्धतीने पोलीसही निश्चिंत…

  शहरात पुर्वी पत्र्याचे शेड व इमारतीच्या पार्किंग, ठरावीक मोकळ्या जागांवर जुगार चालविला जात. या जागा फिक्स असल्याने खेळणाऱ्या शौकिंनांना रायटरला शोधत बसण्याची वेळ येत नसत. पण, गेल्या काही दिवसांत शहरात विशेष पथके व सासूच्या कारवाईने अवैधवाल्यांसोबतच वसूली वाल्यांचे बस्तान उठले आहे. त्यामुळे या नव्या कृ् वापर सुरू झाला आहे. काही धुर्त वसूली वाले व अवैध धंद्यामदील बादशांनी फिरत्या जुगाराची क्लृप्त्या वापरण्यास सुरूवात केली आहे. यामुळे स्थानिक पोलीस देखील निशींत आहेत. कारवाई झालीच तर ते फिरत-फिरत आमच्या हद्दीत आले, असे सांगण्यास हे मोकळे असतात.

  फिरता जुगार म्हणजे काय?

  जुगार मालकांनी जुगारासाठी प्रसिद्ध असणाऱ्या त्या जागांचा परिसरात खेळ घेणाऱ्यांना फिरण्याच्या सूचना दिलेल्या असतात. मग, हे खेळ घेणारे त्याच परिसरात रिक्षात अन दुचाकीवर बसून पण, थोड्या-थोड्या वेळांनी तिकडू-इकड अन इकडून-तिकट फिरत राहतात. खेळणारा बरोबर त्याठिकाणी येतो अन खेळ लावून जातो. त्यातून फायदा म्हणजे, गर्दी होत नाही अन धंदा सुरू नसल्याचे सांगता येते. नुकसान होताना खेळणारे येण्यास धजावत नाहीत. फक्त शौकिन मात्र तिथे जाऊन शोधत खेळ लावतातच.