New Rules : सेल्फ टेस्टिंग किटबाबत मुंबई महापालिकेची नवी नियमावली; उत्पादक, विक्रेते यांना किट विक्रीबाबतचा तपशील पालिकेला देणे बंधनकारक

घरगुती चाचण्या (Home Testing) किंवा रॅपिड अन्टीजेन संच (Rapid Antigen Kits) उत्पादक, विक्रेते यांना किटच्या विक्रीबाबतचे तपशील (Sales Details) पालिकेला देणे (BMC) आता बंधनकारक असणार आहे. पालिकेने या किटच्या वापराबाबतची नियमावली गुरुवारी जाहीर केली आहे.

  मुंबई : मुंबईत कोरोनाचे रुग्ण (Corona Patients In Mumbai) झपाट्याने वाढत आहेत. अनेकजण सर्दी, खोकला, तापाने आजारी आहेत. मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल म्हणून बहुतांशी नागरिकांनी सेल्फ टेस्टिंग किटचा (Self Testing Kits) वापर करून चाचण्या करण्याला प्राधान्य दिले आहे. मात्र यामुळे पॉझिटीव्ह रुग्ण समोर येत नसल्याने पालिकेने सेल्फ टेस्ट किटबाबत नियमावली जाहीर केली आहे.

  घरगुती चाचण्या (Home Testing) किंवा रॅपिड अन्टीजेन संच (Rapid Antigen Kits) उत्पादक, विक्रेते यांना किटच्या विक्रीबाबतचे तपशील (Sales Details) पालिकेला देणे (BMC) आता बंधनकारक असणार आहे. पालिकेने या किटच्या वापराबाबतची नियमावली गुरुवारी जाहीर केली आहे.

  घरगुती किंवा रॅपिड अन्टीजेन चाचण्यांचा वापर वाढला असून याचे अहवाल मात्र वापरणाऱ्यामार्फत संबंधित यंत्रणेला दिले जात नाहीत. त्यामुळे आता वापरकर्त्यांचा पाठपुरावा करणारी यंत्रणा पालिकेने कार्यरत केली आहे. नव्या नियमावलीनुसार, या चाचण्यांचे संच उत्पादन करणाऱ्या कंपन्या, औषध विक्रते किंवा वितरक यांना संच विक्री केलेल्यांची तपशीलवार माहिती पालिकेने दिलेल्या ईमेल आयडीवर दररोज द्यावी लागणार आहे.

  होम टेस्टिंग अँटीजेन किटचे उत्पादक- वितरकांनी क्रमांकाची माहिती द्यावी . मुंबईतील केमिस्ट, फार्मसी, मेडिकल स्टोअर्स, डिस्पेन्सरी यांना विकल्या गेलेल्या किटचे फॉर्म आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांना ईमेल आयडी whogmp.mahafda@gmail.com वर तसेच MCGM च्या एपिडेमियोलॉजी सेलला ईमेलवर ही माहिती उपलब्ध करून देणे उत्पादकांना बंधनकारक करण्यात आले आहे.

  एपिडेमियोलॉजी सेल आणि वॉर्ड टीम, एमसीजीएमची भूमिका

  उत्पादक, वितरक, केमिस्ट, फार्मसी, मेडिकल स्टोअर्स इत्यादींकडून होम टेस्टिंग अँटीजेन किट्सशी संबंधित डेटा इमेलद्वारे प्राप्त केला जाईल. त्यावर एपिडेमियोलॉजी सेल, MCGM द्वारे परीक्षण केले जाईल आणि पुढील आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संबंधित वॉर्डकडे पाठवले जाईल . संबंधित व्यक्तीने आयसीएमआरच्या ॲपवर निकाल अपलोड करावा आणि रुग्णाच्या किंवा संबंधित व्यक्तीच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाईल याची खात्री करण्यासाठी वॉर्ड टीम काम करणार आहे.