कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला नवीन जागेचा पर्याय

नाणारचा प्रकल्प (Nanar Refinery Project) रद्द झालेला असला तरी नाणार, पाळेकरवाडी आणि दत्तवाडी ही तीन गावे वगळून आसपासच्या गावांमध्ये अर्थात राजापूर तालुक्यातील विल्ये दशक्रोशीत रिफायनरी प्रकल्पासाठी तब्बल आठ ते साडेआठ हजार एकर जागेची संमती आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी जमीन मालकदेखील जागा देण्यास तयार आहेत. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पासाठी या जागेचा विचार करावा. जेणेकरून प्रकल्पाची क्षमतादेखील कमी होणार नाही. या मागणीसाठी जागामालकांच्या आणि रिफायनरी समर्थकांचे प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

    कोकणा(Konkan)तील रिफायनरी (Refinery) प्रकल्पाबाबत दिवसेंदिवस नवनवीन घडामोडी आणि मागण्या पुढे येत आहेत. प्रकल्पाच्या सर्व्हेला झालेला विरोध पाहता आज जिल्हाधिकारी कार्यालयात स्थानिक लोकप्रतिनिधी, एमआयडीसी (MIDC) अधिकारी, जिल्हा परिषद, गावचे सरपंच आणि पंचायत समितीचे सदस्य यांच्यात चर्चा होणार आहे.

    नाणारचा प्रकल्प (Nanar Refinery Project) रद्द झालेला असला तरी नाणार, पाळेकरवाडी आणि दत्तवाडी ही तीन गावे वगळून आसपासच्या गावांमध्ये अर्थात राजापूर तालुक्यातील विल्ये दशक्रोशीत रिफायनरी प्रकल्पासाठी तब्बल आठ ते साडेआठ हजार एकर जागेची संमती आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी जमीन मालकदेखील जागा देण्यास तयार आहेत. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पासाठी या जागेचा विचार करावा. जेणेकरून प्रकल्पाची क्षमतादेखील कमी होणार नाही. या मागणीसाठी जागामालकांच्या आणि रिफायनरी समर्थकांचे प्रतिनिधी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

    भेटीमध्ये आठ ते साडेआठ हजार एकर जागेची संमतीपत्र जिल्हाधिकारी यांना दिली जाणार आहे. शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील आम्हाला भेट द्यावी, अशी मागणी केली जाणार आहे. मुख्य म्हणजे, रिफायनरी प्रकल्पासाठी राजापूर तालुक्यातील बारसू सोलगावचा आणि धोपेश्वर गावातील जमिनींचा विचार केला जात आहे. पण, त्याचवेळी जुन्या अर्थात नाणार, पाळेकरवाडी आणि दत्तावाडी ही गावे वगळून आसपासच्या गावातील जमिनींचा विचार करावा, अशी मागणी केली जात आहे. या भागांमध्ये जमीन उपलब्ध असून मालकांची त्याला संमती आहे. असे असताना जागेअभावी प्रकल्प कमी क्षमतेचा करत नुकसान करण्यापेक्षा या जागेचा विचारदेखील करावा, अशी मागणी आता केली जाणार आहे.

    नवीन मागणीतून अपेक्षा काय?
    नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यात आली आहे. पण, याच भागात मोठ्या प्रमाणात जमीनदेखील उपलब्ध आहे. शिवाय, नाणार किंवा आसपासचा परिसर आणि राजापूर तालुक्यातील नवीन जागा यामध्ये मोठा फरक नाही. सध्या ज्या ठिकाणी प्रकल्पासाठी जागेची चाचपणी केली जात आहे. त्या ठिकाणी उभी राहणारी रिफायनरी ही केवळ प्रतिवर्षी २० मिलियन मेट्रिक टन इतक्या क्षमतेची असणार आहे. पण, नाणारच्या आसपासच्या जागेवर रिफायनरी उभी राहिल्यास ही प्रति वर्षी ६० मिलियन मेट्रिक टन इतक्या क्षमतेची असणार आहे. पण, जर ८ हजार एकर जागा उपलब्ध असेल, तर त्याबाबत विचार का करू नये? याच उद्देशाने ही भेट असणार आहे.