सबका बदला लेगा फैजल! अनिल परब दापोली रिसॉर्ट पाडकाम आणि फौजदारी कारवाई प्रकरणात नवा ट्विस्ट; सोमय्या यांनी केलं ट्विट

हे रिसॉर्ट अनधिकृत असून अनिल परब यांच्या या रिसॉर्टवर लवकरच हातोडा पडणार असल्याचे सोमय्या यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. हे रिसॉर्ट पाडण्यासाठी १ कोटींचा खर्च येणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात १ कोटींहून अधिक रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

    मुंबई : साई रिसॉर्ट, दापोली Demolition work of Sai Resort NX and Sea Coanch Resort of Dapoli अनधिकृत बांधकाम प्रकरणी माजी परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब (Anil parab) यांची ईडीने चौकशी केली होती. मनी लाँड्रिंगचा (Money Laundering) पैसा या रिसॉर्टमध्ये वळविल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांनी केला आहे. हे रिसॉर्ट बांधण्यासाठी पैसा कुठून आला हे परबांनी सांगावे. असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.

    हे रिसॉर्ट अनधिकृत असून अनिल परब यांच्या या रिसॉर्टवर लवकरच हातोडा पडणार असल्याचे सोमय्या यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. हे रिसॉर्ट पाडण्यासाठी १ कोटींचा खर्च येणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात १ कोटींहून अधिक रक्कम वर्ग करण्यात आली आहे. यश कन्स्ट्रक्शनचे विजय कुमार त्रिपाठी यांची या पाडकामासाठी नियुक्ती करण्यात आली असून तेच या रिसॉर्टवर हातोडा मारणार आहेत.

    आता या प्रकरणात नवा ट्विस्ट (New Twist) आला असून उद्या (२२ नोव्हेंबर २०२२) सकाळी १० वाजता अनिल परब दापोली रिसॉर्ट पाडकाम आणि फौजदारी कारवाई करण्याबाबत दापोली पोलिस ठाण्यात पोहोचणार असल्याचे नवे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केले आहे.