कल्याणमधील बलात्कार प्रकरणाला नवे वळण, मनोज राय यांना केले जात होते ब्लॅकमेल

कल्याण पूर्व भागात राहणारा भाजप माजी नगरसेवक राय हा व्यवसायाने बिल्डर आहे. त्याने एका चाळीस वर्षीय महिलेस लग्नाचे आमिष दाखविले. तिच्यासोबत राहते घरी शारीरिक संबंध ठेवले.

    भाजप माजी नगरसेवक मनोज राय यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणास वेगळे वळण आले आहे. राय यांनी २७ नोव्हेंबर २०२३ ला पोलीस ठाण्यास पत्र दिले होते. ज्यामध्ये त्यांनी एक महिला पैशांकरीता त्यांना ब्लॅकमेल करीत असल्याचे म्हटले आहे. या पत्रात त्यांनी सर्व हकीगत सांगितली आहे. त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी त्यांना दिली होती. यानंतर पोलिसांचा तपास कोणत्या दिशेेने जातो हे पाहणे महत्वाचे आहे.

    नक्की प्रकरण काय?

    कल्याण पूर्व भागात राहणारा भाजप माजी नगरसेवक राय हा व्यवसायाने बिल्डर आहे. त्याने एका चाळीस वर्षीय महिलेस लग्नाचे आमिष दाखविले. तिच्यासोबत राहते घरी शारीरिक संबंध ठेवले. ती चार वेळा गरोदर राहिली. चारही वेळा तिचा गर्भपात केला. तिने लग्न करण्यासाठी त्याच्याकडे तगादा लावला असता तिला मारझोड केली. मारझोड करुन लग्न करण्यास नकार दिला. याची वाच्यता कुठेही करु नये यासाठी धमकी दिली. पिडीत महिलेने या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पिडीत महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी राय याच्या विरोधात महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

    कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील अर्ज

    तर दुसरीकडे एक धक्कादायक खुलासा झाला आहे. राय यांनी २७ नोव्हेंबर २०२३ रोजी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अर्ज दिला होता. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, २५ वर्षापासून कोळसेवाडी परिसरात राहतात. त्यांची स्वत: ची राय रेसीडेन्सी नावाचा बांधकामाचा व्यवसाय आहे. २०१५ -१६ मध्ये राय यांनी तिसगाव येथे एका महिलेच्या कुटूंबियांची सामाईक विकास आणि मालकीची करण्यासाठी घेतली होती. तेव्हापासून ती महिला त्यांना ओळखते. १०० फूटी रस्ता तिसगाव येथील ती मालमत्ता विकसीत झाल्यावर तिचा मोबादला त्या महिलेस तिला देण्यात आला. परंतू महिलेला पैशाचा लोभ सुटलेला आहे. ती अनेक वेळा माझ्याकडे अतिरिक्त मोबदला मागत आहे. त्यांना अतिरिक्त मोबदला देण्यास मनाई केली असता पैसे दिले नाही तर मला खोट्या केसेसमध्ये अडकविण्याची दमदाटी करीत आहे. त्यामुळे माझ्या विरोेधात खोट्या तक्रारी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझ्या विराेधात तक्रार केल्यास त्या बाबत खात्री करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. एवढेच नाही तर मनोज राय यांचा असा आरोप आहे की, सदर महिलेने त्यांच्याकडून एक घर देखील घेतले आहे आणि त्याचे पैसे ती देणार होती मात्र तिने अजून पैसे दिलेले नाही. ५० लाख रुपये त्या महिलेवर राय यांचा कर्ज आहे परंतु ती महिला पैसे देत नाही आणि त्यासाठी वारंवार गुन्हा दाखल करण्याची धमकी देते.