बांगलादेशने निर्धारित 50 षटकांत 245 धावा, न्यूझीलंडच्या 24 ओव्हरमध्ये 114 धावा, पाहा लाईव्ह अपडेट

    चेन्नई : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 12 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 56 धावा केल्या आहेत. बांगलादेशची सुरुवातच डळमळीत झाली. सलामीला आलेल्या लिटन दास आणि तान्झीद हसन यांची विकेट लवकरच गेल्याने बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारणे अवघड जाणार आहे. मेहदी हसन मिर्झाने 30 धावा करून तंबूचा रस्ता धरला. मेहंदी हसन मिर्झाला लोकी फर्गुसनने तंबूचा रस्ता दाखवला. नजमुल हसन शांतो अवघ्या 7 धावांवर पॅव्हेलिनचा रस्ता धरला.

     

    न्यूझीलंड 246 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरली, डेव्हीड कॉन्वे आणि राचिन रवींद्र यांनी डावाला सुरुवात केली. डेव्हीड कॉन्वे याला शाकिबने पायचित केले. राचिन रवींद्र हा आज अवघ्या 9 धावांवर बाद झाला. काने विल्यमसन आणि डेरी मायकेल सध्या खेळत आहेत. काने विल्यमसन सध्या 32 धावांवर खेळत आहे.

    न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विल्यमसन (क), डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

    बांगलादेश : लिटन दास, तन्झीद हसन, नजमुल हुसेन शांतो, मेहिदी हसन मिराझ, शकीब अल हसन (क), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), तौहिद हृदोय, महमुदुल्लाह, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान