काल ‘सीएम’ची भेट अन् आज पोलिसांच्या परेडला हजेरी..! पुण्यातील टॉप गँगस्टरची पुणे पोलिसांकडून परेड; 300 हुन अधिक गुन्हेगार हजर

नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला आहे. त्यांनी गुन्हेगारांना पहिलाच दणका देत इतिहासात प्रथमच एकाच वेळी टॉपमोस्ट गँगस्टरसह हिस्ट्री शिटर व टोळीप्रमुख तसेच सराईत गुन्हेगार एकाचवेळी 'पोलीस आयुक्तालयात' बोलवत त्यांचा परेड घेतला आहे.

  अक्षय फाटक, पुणे –  पुण्यातील ‘टॉप मोस्ट गँगस्टर’नी राजकीय आश्रयासाठी गाठी भेटी घेत राजकीय वातावरण ढवळून काढले असताना आणि आज मात्र पुणे पोलिसांनी हजेरी लावली आहे. अगदी काल “सीएम”ची भेट घेतली आणि आज गुंड निलेश घायवळ पोलीस आयुक्तालयात परेडला हजेरी लावली आहे. पुणे पोलिसांच्या या हजेरीने राजकीय आश्रय घेऊ पाहणाऱ्या या गुन्हेगारांना ‘घाम’ फुटला आहे. गुंड गजानन मारणे, निलेश घायवळ, बाबा बोडके, सचिन पोटे, राकेश चव्हाण, उमेश चव्हाण, टिपू सुलतान यांच्यासह साथीदार उपस्थित आहेत.

  नवनियुक्त आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला आहे. त्यांनी गुन्हेगारांना पहिलाच दणका देत इतिहासात प्रथमच एकाच वेळी ‘टॉप मोस्ट गँगस्टर’सह हिस्ट्री शिटर व टोळीप्रमुख तसेच सराईत गुन्हेगार एकाचवेळी ‘पोलीस आयुक्तालयात’ बोलवत त्यांचा परेड घेतला आहे. या अनोख्या स्टाईलने गुन्हेगारांचा देखील घाम फुटला आहे.

  गुन्हेगारांना सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी तंबी देत सूचना दिल्या आहेत. सोशल मीडियावर नजर असून, आपण पब्लिसिटी जे करता ते बंद करा असे सुनावले आहे. त्यासोबतच चौकशी किंवा पोलीस ठाणे अथवा गुन्हे शाखेने बोलावले तर अर्ध्या तासात हजर रहा. आम्हाला वेळ नाही, मी बाहेर आहे अशी कारणे सांगू नका, असेही यावेळी सांगितले आहे.
  तुमचे मोबाईल क्रमांक आणि बदलेला क्रमांकाची माहिती लागलीच कळवा. राहण्याचा पत्ता, नोकरी, करत असलेले काम याचीही माहिती देण्याबाबत सांगण्यात आले आहे.

  काल सीएमची भेट आज परेडला हजेरी..!

  पुण्यातील गँगस्टर निलेश घायवळ याने नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर मंत्रालय परिसरातील त्याचा एक रिल्स देखील समोर आला आहे. यानंतर आजच पुणे पोलिसांनी त्याची गुन्हेगार परेडमध्ये हजेरी लावली आहे.

  एक खून अन् शहरातील गुन्हेगारांची झाडाझडती

  शहरात टोळीयुद्ध काही काळ शांत राहिले असल्याचे दिसत होते. मात्र नुकताच गँगस्टर शरद मोहोळ याचा खून झाला आणि पुन्हा टोळीयुद्ध भडकेल असे सांगितले जात आहे. यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी या गुन्हेगारांची हजेरी सुरू केली असून, त्यांच्यावर लक्ष ठेवले आहे