नवनिर्वाचित सरपंचांचा राष्ट्रवादीकडून सत्कार

मावळ तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या.यात चार गावांची निवडणूक बिनविरोध झाली.उर्वरित गावांमध्ये रविवारी (दि.५) मतदान झाले. सोमवार (दि.६) रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकालांमध्ये मावळ तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारांच्या सरपंचांना मतदारांनी संधी दिल्याचे स्पष्ट दिसत आहे.

    वडगाव मावळ: मावळ तालुक्यात सोमवारी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजयी झालेल्या लोकनियुक्त सरपंचांचा व सदस्यांचा सत्कार मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार सुनिल शेळके यांच्या तळेगाव दाभाडे येथील जनसंपर्क कार्यालयात करण्यात आला.भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून दावे प्रतिदावे करण्यात येत होते.परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकत थेट राष्ट्रवादीच्या विचारांच्या सरपंचांचा जाहीर सत्कार केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडे एकवीसपैकी तेरा ग्रामपंचायतीचे सरपंच असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

    मावळ तालुक्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या.यात चार गावांची निवडणूक बिनविरोध झाली.उर्वरित गावांमध्ये रविवारी (दि.५) मतदान झाले. सोमवार (दि.६) रोजी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकालांमध्ये मावळ तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारांच्या सरपंचांना मतदारांनी संधी दिल्याचे स्पष्ट दिसत आहे.ग्रामपंचायत निवडणुकीतील यशामुळे सर्वसामान्य जनता आजही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदवडी,दिवड,मळवंडी ढोरे, भाजे,कोंडीवडे, उदेवाडी, मुंढावरे, सुदुंबरे,सांगीसे,कल्हाट, शिरगाव, बेबडओहोळ,लोहगड या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीकडून दावा करण्यात आला असून जांबवडे,ओवळे,पुसाणे या गावचे सरपंच देखील सत्कारास उपस्थित होते.तसेच सर्व ग्रामपंचायतीतील नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.

    ग्रामविकासाचा केंद्रबिंदू असलेल्या सरपंचांनी गावाचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत. गावाचे गावपण टिकले पाहिजे, यासाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करावे.आमदार म्हणून मी सर्वतोपरी आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील.कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही- सुनिल शेळके,आमदार मावळ

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासावर ग्रामस्थांनी विश्वास दाखवला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास कामांसाठी दिलेला कोट्यावधीचा निधी व आमदार सुनिल शेळके यांच्या नेतृत्वाचा हा विजय असून गावपातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या कष्टाचे हे फळ आहे. – गणेश खांडगे,तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मावळ.

    या सत्कार समारंभ प्रसंगी माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके,दिपक हुलावळे,हभप रामदास धनवे, नारायण ठाकर, संदीप आंद्रे, अंकुश आंबेकर, देवा गायकवाड, आजी-माजी पदाधिकारी,ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.