Bacchu Kadu

दुपारी १ वाजताच्या सुमारास बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मतदान केलं. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचं महत्त्व त्यांनी आज पुन्हा एकदा वाढल्याचं दिसून आलं. अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांच्या (Independent and small party MLA) वाढलेल्या वजनावरुन अपक्ष आमदार मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. येणारा काळ हा अपक्ष आमदारांचा असणार आहे. हम बोलेंगे वैसे ही सरकार चलेगा, असं बच्चू कडू म्हणाले.

    मुंबई : आज विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) निवडणुका होत आहेत. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार (MLC Election 10 seat) रिंगणात उतरले आहेत. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये (Congress and BJP) लढत रंगणार आहे. या जागेसाठी भाजपाचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात लढत होणार आहे. भाजपा व मविआ (BJP and MVA) या दोघांनी एक एक मतांसाठी अपक्षांची मनधरणी करत आहेत. तसेच मतांच्या जुळवाजुळवीसाठी आमदारांना मागील चार दिवसांपासून आमदारांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. भाजप व मविआने जोरदार फिल्डिंग (For one one vote MVA and BJP fielding) लावली आहे. मतांसाठी अपक्षांना राज्यसभा निवडणुकीसह विधानपरिषद निवडणुकीत सुद्धा विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळं अपक्ष आमदारांना या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

    दरम्यान, दुपारी १ वाजताच्या सुमारास बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मतदान केलं. अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचं महत्त्व त्यांनी आज पुन्हा एकदा वाढल्याचं दिसून आलं. अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांच्या (Independent and small party MLA) वाढलेल्या वजनावरुन अपक्ष आमदार मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. येणारा काळ हा अपक्ष आमदारांचा असणार आहे. हम बोलेंगे वैसे ही सरकार चलेगा, असं बच्चू कडू म्हणाले.

    आगामी काळात प्रहार संघटनेचा सुद्धा मुख्यमंत्री असू शकतो. असं मंत्री बच्चू कडू म्हणाले. येणारा काळ हा छोट्या पक्षाच्या आमदारांचा आणि अपक्ष आमदारांचा असणार आहे. कारण निवडणुकीत दिवसेंदिवस त्यांचं वजन वाढत आहे. राज्यसभा निवडणुकीत सुद्धा आपण पाहिलं. तसेच आता या निवडणुकीत सुद्धा याचा प्रत्यय येत आहे. दरम्यान पुढील मुख्यमंत्री प्रहार संघटनेचाच असेल असं हसत हसत मंत्री बच्चू कडू म्हणाले.