आमदार अपात्र प्रकरणी पुढील सुनावणी 2 आठवड्यानंतर; कागदपत्राअभावी…, शिंदे गटाने काय म्हटलं?

दोन्ही गटाकडून आमदार उपस्थित देखील होते. मात्र आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. दोन आठवड्यानंतर आता पुढील सुनावणी होणार आहे. कागदपत्रा अभावी सुनावणी होणार नाही, पुरसे कागदपत्र नसल्यामुळं सुनावणी किंवा दोन्हीकडून म्हणणे ऐकून घेता येत नाही.

    मुंबई – राज्यात मागील वर्षी शिवसेनेत (Shivsena) मोठी फूट पडली. यानंतर शिंदे गट व ठाकरे गट अनेकवेळा आमनेसामने आलेत. शिंदे गटाने (Shinde Group) मोठे बंड केल्यानंतर भाजपासोबत सरकार स्थापन केले. यानंतर पक्षाचे चिन्ह व पक्षावर शिंदे गटाने आपला दावा सांगितला होता. यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्ट आणि त्यानंतर निवडणूक आयोगाकडे गेले. काही महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगाने निकाल देताना, शिवसेना पक्ष व चिन्ह हे शिंदे गटाच्या शिवसेनेला दिले आहे. मात्र शिंदे गटाच्या बंडानंतर ठाकरे गटानं शिंदे गटातील १६ आमदार अपात्र आहेत, म्हणत न्यायालयात याचिका दाखल केली होती. वर्षभरानंतर कोर्टानं निकाल देताना, हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात चेंडू टोलावला आहे. यामुळं या प्रकरणी आज दिवसभर सुनावणी पार होणार होती, मात्र आता ही सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे. (Next hearing in MLA disqualification case after 2 weeks; Lack of documents…What did the Shinde group say)

    कागदपत्रा अभावी…

    दरम्यान, आज दिवसभर सुनावणी पार पडणार होती. यासाठी दोन्ही गटाकडून आमदारांना नोटीस देण्यात आली होती. दोन्ही गटाकडून आमदार उपस्थित देखील होते. मात्र आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. दोन आठवड्यानंतर आता पुढील सुनावणी होणार आहे. कागदपत्रा अभावी सुनावणी होणार नाही, पुरसे कागदपत्र नसल्यामुळं सुनावणी किंवा दोन्हीकडून म्हणणे ऐकून घेता येत नाही. काही पुरावे नाहीत. त्यामुळ पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार असल्याचं शिंदे गटाचे वकील साखरे यांनी सांगितले. दरम्यान, आजच सुनावणी व्हावी यावर ठाकरे गट ठाम होता, पण तसे झाले नाही.

    दोन्ही गटांना नोटीस 

    अध्यक्षांनी दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीसा पाठवल्या होत्या. या दोन्ही गटाकडून उत्तर मिळाले असून, यावर आज सुनावणी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला होता. त्यानुसार यात वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणे मांडण्याची संधी दिली जाणार आहे. विधिमंडळात होणाऱ्या या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस बजावण्यात आली आहे. शिवसेनेच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावली आहे.