दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होणार? रस्ते कामांची माहिती देण्यासाठी बॅरिकेडवर ‘क्यू आर कोड’

येत्या दोन वर्षात संपूर्ण मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील, याचा महानगरपालिका प्रशासनाला (Mumbai palika administrator) विश्वास आहे. वेगवेगळ्या रस्ते कामांच्या निविदा एकत्रित स्वरूपात मागवल्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग बांधणीचा अनुभव असलेल्या नामांकित व मोठ्या कंपन्या या निविदा प्रक्रियेत सहभागी होतील, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे. यामुळं मुंबई पालिका प्रशासनाने एक मोठ् पाऊल समजलं जात आहे.

    मुंबई : मुंबईची तुंबई हे समीकरण ठरलेलं आहे. मुंबईत थोडाफार पाऊस (Mumbai rain) पडला की, पाणी आणि खड्डे (pathools) यामुळं मुंबईकरांचे प्रचंड हाल होतायेत, तसेच खड्यामुळं अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र यावर कायमस्वरुपी उपाय काढण्यासाठी मुंबई पालिका (BMC) प्रशासनाने एक मोठ् पाऊल उचललं आहे. मुंबई महानगरातील सुमारे ४०० किलोमीटर अंतराच्या रस्त्यांची दर्जोन्नती आणि सुधारणा करण्यासाठी एकूण सुमारे ५ हजार ८०० कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या ५ निविदा निमंत्रित केल्या आहेत. हे सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटने (Road ciment) बांधले जाणार असून, त्यामुळे येत्या दोन वर्षात संपूर्ण मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील, याचा महानगरपालिका प्रशासनाला (Mumbai palika administrator) विश्वास आहे. वेगवेगळ्या रस्ते कामांच्या निविदा एकत्रित स्वरूपात मागवल्याने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील महामार्ग बांधणीचा अनुभव असलेल्या नामांकित व मोठ्या कंपन्या या निविदा प्रक्रियेत सहभागी होतील, अशी प्रशासनाला अपेक्षा आहे. यामुळं मुंबई पालिका प्रशासनाने एक मोठ् पाऊल समजलं जात आहे.

    सुमारे ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार असून त्यासाठी एकूण पाच निविदा निमंत्रित करण्यात आल्या आहेत. या पाच निविदांमध्ये समाविष्ट असलेल्या कामांसाठी एकूण अंदाजित ५ हजार ८०६ कोटी रुपये खर्च होणार आहे. या निमंत्रित निविदांमध्ये मुंबई शहर विभागासाठी सुमारे ७१ किलोमीटर अंतराच्या रस्ते कामांसाठी १ हजार १९४ कोटी रुपये अंदाजित खर्चाची एक निविदा समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे पूर्व उपनगरे विभागातील सुमारे ७० किलोमीटर अंतराच्या रस्ते कामांसाठी ८११ कोटी रुपये अंदाजित खर्चाची एक निविदा आहे. तर पश्चिम उपनगरांमधील तीनही परिमंडळांसाठी स्वतंत्र अशा एकूण तीन निविदा आहेत. यामध्ये एकूण २७५ किलोमीटर अंतराच्या रस्ते कामांसाठी ३ हजार ८०१ कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. तसेच रस्ते कामांची माहिती देण्यासाठी बॅरिकेडवर ‘क्यू आर कोड’ पदधत अवलंबली जाणार आहे, त्यामुळं आगामी काळात, खड्ड्यापासून मुंबईकरांना सुटका मिळणार असं म्हटलं तरी ते वावगं ठरु नये.