दाऊदचा निकटवर्तीय एनआयएच्या ताब्यात; नागपाडा, भेंडी बाजार, गोरेगाव, मुंब्रा, कोल्हापूर आणि… तब्बल 20 ठिकाणी धाड

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकांशी संबंधित मुंबईतील 20 ठिकाणांवर आज एनआयएने छापे टाकले आहेत. दाऊदचे चेले छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इक्बाल मिर्ची, दाऊदची बहीण हसिना पारकर आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित लोकांपर्यंत एनआयएच्या आजच्या कारवाईची व्याप्ती आहे. एनआयएने छोटा शकिलचा मेव्हणा सलीम फ्रूट याला ताब्यात घेतले आहे(NIA Action on Dawood Ibrahim).

    मुंबई :  कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकांशी संबंधित मुंबईतील 20 ठिकाणांवर आज एनआयएने छापे टाकले आहेत. दाऊदचे चेले छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इक्बाल मिर्ची, दाऊदची बहीण हसिना पारकर आणि त्यांच्या नातेवाईकांशी संबंधित लोकांपर्यंत एनआयएच्या आजच्या कारवाईची व्याप्ती आहे. एनआयएने छोटा शकिलचा मेव्हणा सलीम फ्रूट याला ताब्यात घेतले आहे(NIA Action on Dawood Ibrahim).

    एनआयएने आज बोरिवली, सांताक्रूझ, वांद्रे, नागपाडा, भेंडी बाजार, गोरेगाव, परळ, मुंब्रा आणि कोल्हापूर येथील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. मुंबईतील काही तस्कर, हवाला ऑपरेटर, रिअल इस्टेट व्यापारी यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे. या सर्वांचे कनेक्शन 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि फरारी दहशतवादी दाऊद इब्राहिमशी असल्याचे सांगितले जात आहे.

    आजच्या कारवाईत एनआयएने छोटा शकिलचा मेव्हणा सलीम फ्रूट याला ताब्यात घेतले आहे शकील आपल्या गुंडांच्या माध्यमातून खंडणीचे रॅकेट चालवतो. सलीम फ्रुट्सला 2006 मध्ये आखाती देशातून भारतात पाठवण्यात आले होते आणि 2010 पासून तो तुरुंगात होता.

    फेब्रुवारीमध्ये गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार एनआयएने दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी कंपनीविरुद्ध बेकायदेशीर वसुलीचा गुन्हा दाखल केला होता. सध्याची छापेमारी त्याच प्रकरणी सुरू आहे, असे एएनआयतर्फे सांगण्यात आले आहे. हे गुंड खंडणीचा पैसा देशविरोधी कामांसाठी वापरतात, असा आरोप आहे. एनआयएने या प्रकरणी बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा म्हणजेच यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जबाब नोंदवले जाऊ शकतात.