NIA कडून देशातील १३ ठिकाणी छापे; हातकणंगले तालुक्यातून दोघांना घेतले ताब्यात

राष्ट्रीय तपास यंत्रणेने महाराष्ट्रातल्या कोल्हापूर आणि नांदेडसह देशांतल्या १३ ठिकाणी छापे टाकले आहेत. सहा राज्यातल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, साहित्य जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे रहात असलेल्या दोघांना ताब्यात घेतले आहे. एनआयएने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

    कोल्हापूर : राष्ट्रीय तपास यंत्रणेने महाराष्ट्रातल्या कोल्हापूर आणि नांदेडसह देशांतल्या १३ ठिकाणी छापे टाकले आहेत. सहा राज्यातल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, साहित्य जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे रहात असलेल्या दोघांना ताब्यात घेतले आहे. एनआयएने केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

    राष्ट्रीय तपास यंत्रणेने एनआयएने आज आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात देशातील ७ राज्यांमध्ये १३ संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतली आहे. यामध्ये राज्यातील कोल्हापूर आणि नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. यामध्ये हुपरी येथे नातेवाईकांची खोली घेऊन भाड्याने राहिलेल्या दोघांना या यंत्रणेने ताब्यात घेतले आहे. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे.

    एनआयएने मोठी कारवाई करताना मध्य प्रदेशातील भोपाळ आणि रायसेन, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद, बिहारमधील अररिया, कर्नाटकातील भटकळ आणि तुमकूरमध्ये छापेमारी केली. उत्तर प्रदेशातील देवबंद जिल्ह्यांमध्ये ISIS च्या कारवायांशी संबंधित छापेमारी करण्यात आली. सहा राज्यामध्ये केलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, साहित्य जप्त करण्यात आले आहेत. ISIS मॉड्यूल प्रकरणाच्या तपासात ६ राज्यांमध्ये अनेक ठिकाणी शोध घेतला जात आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे ही कारवाई केली आहे.

    या कारवाईत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, साहित्य जप्त करण्यात आले आहेत. ISIS मॉड्यूल प्रकरणाच्या तपासात राज्यांमध्ये अनेक ठिकाणी शोध घेतला जात आहे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी, रेंदाळमध्ये एनआयएने कारवाई करून इर्शाद शौकत शेख आणि त्याचा भाऊ अल्ताब शेख या दोघांना ताब्यात घेतलं आहे. इर्शाद हा लबैक इमदाद फौंडेशनचा अध्यक्ष म्हणून काम पाहतो. एनआयएने ही कारवाई पहाटेच्या सुमारास केली आहे.

    या दोघांना दहा मिनिटांसाठी घेवून जातो अस सांगून दोघांनाही ताब्यात घेतल्याची माहिती आता समोर आली आहे. याबाबत स्थानिक पोलिसाना कारवाई बाबत कोणतीही माहिती नसल्याने कारवाईबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.