उमेश कोल्हे हत्या प्रकरणी माहिती देणाऱ्याला एनआयए देणार दोन लाखाचं बक्षीस

या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या प्रकरणाचा तपास स्वतंत्ररीत्या सुरू केला होता. आरोपी शमीम अहमदवर माहिती देणाऱ्याला एनआयएकडून दोन लाखाचं बक्षीस देण्यात येणार आहे.

    अमरावती : अमरावती (Amravati) येथील व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणी (Umesh kolhe Murder) तपास यंत्रणा एनआयएनं फरार आरोपी शमीम अहमदवर दोन लाखाचं बक्षीस जाहीर केलं आहे. या हत्येप्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

    नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश‍कोल्हे हे दुकान बंद करून मोटरसायकलने घरी जात असताना रात्री १०.३० च्या सुमारास श्याम चौकातील घंटाघर परिसरात चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) या प्रकरणाचा तपास स्वतंत्ररीत्या सुरू केला होता. आरोपी शमीम अहमदवर माहिती देणाऱ्याला एनआयएकडून दोन लाखाचं बक्षीस देण्यात येणार आहे.