निलेश माझीरे पुन्हा मनसेत; राज ठाकरेंनीच केली ‘या’ पदावर  नियुक्ती

पुन्हा एकदा निलेश माझीरे यांची माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यपदी निवड करण्यात आली आहे. स्वत: राज ठाकरेंनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. त्यामुळे वसंत मोरेंचा मावळा परतला असे म्हणता येईल.

    पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये मागच्या अनेक दिवसांपासून धुसपूस सुरु आहे. पक्षाचे माथाडी सेनेचे अध्यक्ष निलेश माझीरे यांनी यालाच कंटाळून पक्षाला जय महाराष्ट्र केला होता. निलेश माझीरेंना वसंत मोरे यांचे कट्टर समर्थक मानले जाते. त्यांनीच पक्षाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली होती.

    दरम्यान आता पुन्हा एकदा निलेश माझीरे यांची माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यपदी निवड करण्यात आली आहे. स्वत: राज ठाकरेंनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे. त्यामुळे वसंत मोरेंचा मावळा परतला असे म्हणता येईल.

    निलेश माझीरे यांनी राजीनामा म्हणजे पुणे मनसेसाठी फार मोठा धक्का मानला जात होता. शिवसेना नेते सचिन अहिर यांनीही काही दिवसांपुर्वी निलेश माझीरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती.

    परंतु राज ठाकरेंना निलेश माझीरेंची मनधरणी करण्यात यश आले आहे. त्यांना पुन्हा माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्हाध्यपदी निवड करण्यात आली आहे.