
अजित पवार यांनी सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर उत्तर म्हणून केलेल्या भाषणातील एका दाव्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या दाव्यावर आज सकाळी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली.
मुंबई – विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजलं आणि नागपूरमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून चालू असलेला राजकी आखाडा शांत झाला. मात्र, अधिवेशनामध्ये दोन्ही बाजूच्या आमदार मंडळींनी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांचे आणि दाव्यांचे पडसाद पुढचे काही दिवस राज्याच्या राजकारणात उमटताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर उत्तर म्हणून केलेल्या भाषणातील एका दाव्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या दाव्यावर आज सकाळी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी एक स्क्रीनशॉट शेअर करून अजित पवारांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.
अजित पवार साहेब हे तुमचंच आहे ना??? pic.twitter.com/z8rqMbTgzG
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 31, 2022
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेला एक दावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. “छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो. काहीजण धर्मवीर म्हणतात. राजे कधीही धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली”, असं अजित पवार म्हणाले.