vinayak raut

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी २४ ऑक्टोबरला राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. यामुळे राज्यातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.

    केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी २४ ऑक्टोबरला राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती. यामुळे राज्यातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. पण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केल्यानंतर निलेश राणेंनी आपली निवृत्ती मागे घेतली. यातच आता खासदार विनायक राऊत यांनी निलेश राणेंवर हल्लाबोल चढविला आहे.

    “निलेश राणेंनी राजकीय निवृत्ती घेऊ नये. पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरावं. मग, पराभव काय असतो, ते दाखवतो,” असं आव्हान विनायक राऊतांनी निलेश राणेंना दिलं आहे.

    विनायक राऊत म्हणाले, “राजकीय नाटक कसं करायचं, हे राणे कुटुंबाकडून शिकूव घ्यावं. एकीकडे नारायण राणेंनी निलेश राणेंना फटकारलं आहे. तर, दुसरीकडे नितेश राणेंनी निलेश राणेंना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोकण दौऱ्यात आले असताना निलेश राणेंना कुठं स्थान मिळालं, हे सर्व लोकांनी पाहिलं आहे.”

    “फडणवीसांनी सांगितल्यामुळे निलेश राणेंनी वळवळ चालू केली आहे. पण, ही फार दिवस चालणार नाही. निलेश राणेंनी राजकारणातून निवृत्ती घेऊ नये. पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरावं. पराभव काय असतो, ते दाखवतो,” असं आव्हान विनायक राऊतांनी निलेश राणेंना दिलं आहे.