
अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून, इसबावी येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ९ होड्या कटरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.
पंढरपूर : अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली असून, इसबावी येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ९ होड्या कटरच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी पथकाची नेमणूक केली आहे. या पथकात तहसलिदार सुशिल बेल्हेकर, मंडळ अधिकारी रिगन चव्हाण, तलाठी कैलास घुसिंगे, निलेश कुंभार, समाधान शिंदे, दत्ता कोताळकर, राजेंद्र वाघमारे लिपिक विजय झोरे सहभागी होते.
अशी केली कारवाई
इसबावी हद्दीतील सांगोला पाणी पुरवठा योजना व पंढरपूर नगरपालिका, पाणी पुरवठा योजना येथील भीमा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ९ लाकडी होड्या महसूल पथकाच्या निदर्शनास आल्या. संबधित ठिकाणी पथकाने तत्काळ कारवाई करुन होड्या कटरच्या सहाय्याने पुर्णपणे नष्ट केल्या.