Going for a swim is useless! Two friends drown in Valaki dam

खडकवासला धरणा वळ डोणजे, गोर्हे खुर्द याठिकाणी नऊ मुली पाण्यात बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेत सात मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली असून दोन बेपत्ता मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

    पुणे – पुण्यातून (Pune) एक दुख:द बातमी समोर येत आहे. बारशाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या नऊ मुलींना (nine girls) पोहण्याची लहर आहे. त्या नऊ मुली खडकवासला धरणात (Dam) पोहायला गेल्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने धरणात नऊ मुली बुडाल्या. त्याली सात मुलींना बाहेर सुखरुप काढण्यात आले आहे. तर दोन मुलींचा दुर्दैवी मृत्य़ू झाला आहे. खडकवासला धरणा वळ डोणजे, गोर्हे खुर्द याठिकाणी नऊ मुली पाण्यात बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेत सात मुलींची सुखरूप सुटका करण्यात आली असून दोन बेपत्ता मुलींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    अग्निशमन दलाकडून बेपत्ता मुलींचा शोध सुरु

    दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या जवानांकडून बेपत्ता मुलींचा पाण्यात शोध सुरू केला आहे. तसेच खुशी संजय खुर्दे (वय 14), शीतल भगवान टीटोरे (वय 15) असे मृत पावलेल्या मुलींची नावे आहेत. सर्व मुली मूळच्या बुलढाण्याच्या असून गोरेखुर्द या गावात गोरे खुर्द या गावात बारशाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या. पाण्याचा अंदाज न आल्याने सर्व नऊ मुली पाण्यात बुडाल्या. सुदैवाने 7 जणी वाचल्या मात्र दोघींचा मृत्यू झाला आहे.

    मुलींचा आरडाओरड…

    कलमाडी फार्म हाऊस जवळ खडकवासला धरणाच्या पाण्यात आज सकाळी 9 मुली होण्यासाठी उतरल्या होत्या. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने नऊ मुली पाण्यात बुडाल्याने त्यांनी आरडाओरड सुरू केली. यावेळी जवळच दशक्रिया विधीसाठी आलेल्या स्थानिकांनी त्यापैकी सात मुलींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले तर दोन मुली अद्याप सापडल्या नाहीत. याबाबतची माहिती हवेली पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. या दुर्देवी घटनेमुळं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.