कणकवलीत निर्भय बनो सभा, भाजपाला २०२४ ची निवडणूक राम मंदिराच्या मुद्द्यावर जिंकायची आहे

आमची लोकशाही संसदीय आहे, लोकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. आकडेवारी मोदी- शहा २०१४ साली येणार नाही. हा डाव हातातून गेलेला नाही. सत्तेचे उच्चाटन हे महाराष्ट्रातून होणार आहे. संपूर्ण देशात धूर्विकरण झाले आहे.

    निर्भय बनो ही अहिंसक चळवळ आहे. इथल्या आमदारांनी आमच्या सभेवर टीका केली. मात्र, निर्जलपणाचा कळस ५० खोके देऊन तुमचा पक्ष सत्ता स्थापन करणारा आहे. त्यामुळे आपल्याला २०२४ मध्ये निर्णय घ्यावा लागेल, आया बहिणी सुरक्षित आहेत का? राम मंदिर झालं याचा सर्वानाच आनंद आहे. त्याचे राजकारण करायला आमचा विरोध आहे. मी हिंदू आहे, तुमच्या कोणत्याही नेत्यापेक्षा रामरक्षा स्तोत्र म्हणून दाखतो. आम्ही गांधी आणि आंबेडकर आणि तिरंग्याची माणसे आहोत, असे मत डॉ.विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केले.

    आमचा राम गांधीजींचा आहे, नथुरामांचा नाही. राम नाम घेण्यासाठी गेलेल्या गांधींना नथुरामने मारले. बहुजनांची डोकी फिरवली जात आहेत, ते कोण आहेत हे पहा. धर्माच्या गैर वापरला आमचा विरोध आहे. भाजपने २०१४ लोकसभा निवडणुक जाहीरनाम्यामध्ये शेवटच्या पानावर राम मंदिर होते. त्यानंतर आता २०२४ मध्ये पुन्हा राम मंदिराच्या मुद्द्यावर निवडणूक जिंकायची आहे. श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी देशाच्या राष्ट्रपती दौपती मुर्मु यांना महिला म्हणून की त्या आदिवासी आहेत म्हणून टाळले? त्याचे उत्तर देशाला भाजपाने दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे शंकराचार्य, लालकृष्ण अडवाणींना का बोलावलं नाही याचे उत्तर मोदींनी द्यावे. राम मंदिरात केवळ मोदीच दिसले. तुम्ही एकटेच का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

    उद्धव ठाकरे यांचे कौतुक आहे त्यांनी काळाराम मंदिरात आरती केली. महाराष्ट्रात राम कुटुंब वत्सल आहे. हिंदुत्वाचा नावाखाली जे चाललं चुकीचे आहे. सगळीकडे भाजपची दुहेरी भूमिका आहे. राजकारण बदललं की यांची भूमिका बदलत आहेत. हिंदूंनी ठणकावून सांगितलं पाहिजे, आम्ही जबाबदार हिंदू आहोत. संविधानाच्या मोडतोड करण्याची यंत्रणा काम करीत आहे. आंदोलने झाल्यानंतर संघाने २००२ मध्ये तिरंगा ध्वज फडकवला. गुजरात मॉडेलची सत्य हकीगत वेगळीच आहे. गुजरात शिक्षणात पाचव्या स्थानावर आहे, ३८ टक्के लोकांना चांगले अन्न मिळत नाही. कोरोना काळात उद्धव ठाकरे सरकारनेच चांगले काम केले, त्यांनीच गुजरातमध्ये ऑक्सिजन दिला. देशात मोदी सरकार म्हणजे फेकाफेकीला अंत नाही, असा टोला डॉ.विश्वभर चौधरी यांनी लगावला.

    महागाईचा आगडोंब उसळला आहे, पेट्रोल ६६ वरुन आता १०७ रुपये झाले, डिझेल वाढले. गॅस किंमती वाढल्या. देशावरील कर्ज मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसायला या सरकारला वेळ नाही. भ्रष्ट्राचार कमी नाही तर उलट अंदानीचे मजबुतीकरण का केलं जाते. राज्यात इडीची दादागिरी आहे. अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटीचा आरोप झाला मात्र १.७१ कोटी रुपयांचे आरोप कोर्टात सरकारने सांगितले. विरोधी पक्षाला नेस्तनाबूत करण्यासाठी ईडीचा वापर केला जात आहे. राज्यातील नारायण राणे यांच्या सह २१ नेते हे भाजपा सोबत गेल्यावर भ्रष्ट्राचार मुक्त झाल्याचा आरोप चौधरी यांनी केला.

    आमची लोकशाही संसदीय आहे, लोकांमध्ये निराशेचे वातावरण आहे. आकडेवारी मोदी- शहा २०१४ साली येणार नाही. हा डाव हातातून गेलेला नाही. सत्तेचे उच्चाटन हे महाराष्ट्रातून होणार आहे. संपूर्ण देशात धूर्विकरण झाले आहे. महाराष्ट्र जेव्हा यांना रोखणार तेव्हा यांची देशातील सत्ता जाईल. हिडीस पातळीवरचा हा व्यक्तिवाद आहे. देशात काही झालं तरी मोदी असतात. सेल्फीचे बूथ रेल्वे स्टेशनवर आहेत, ते कशासाठी? भाजपाने प्रचंड मोठी यंत्रणा खोटं पसरविण्यासाठी लावली आहे. कर्नाटकात आयटी सेलवर पहिली धाड टाकली. राज्यात आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिले आयटी सेल बंद करायला हवेत, हे वैभव नाईक यांनी काम केलं पाहिजे, असे श्री चौधरी यांनी सांगितले.