राहुल गांधींच्या भारत जोडोत कलाकार पैसे देऊन आणले, नीतेश राणे यांची टीका

आतापर्यंत भारत जोडो यात्रेत अनेक कलाकरांनी हजेरी लावली. यात्रेत दिसणारे कलाकार पैसे देऊन आणले आहे, त्यांनिमित्ताने सगळी नौंटकी सुरू असल्याचा आरोपही नीतेश राणेंनी केला आहे. भारत जोडो यात्रेच्या टीमकडून एक मॅसेज पाठवल्याचे समोर आले आहे.

    मुंबई – भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. यात्रेत १५ मिनिटे चालणारे कलाकार यांना पैसे देऊन् आणल्याचा आरोप करत राहुल गांधींवर टीका केली आहे. तर टविट करत कलाकारांना पैसे दिल्याचा हा पुरावा आहे म्हणत एक स्क्रीन शॉट पोस्ट केला आहे.

    आतापर्यंत भारत जोडो यात्रेत अनेक कलाकरांनी हजेरी लावली. यात्रेत दिसणारे कलाकार पैसे देऊन आणले आहे, त्यांनिमित्ताने सगळी नौंटकी सुरू असल्याचा आरोपही नीतेश राणेंनी केला आहे. भारत जोडो यात्रेच्या टीमकडून एक मॅसेज पाठवल्याचे समोर आले आहे. यात्रेत  १५ मिनिटे चालून राहुल गांधींना पाठिंबा देणारे कलाकार पैसे देऊन आणण्यात आले का?, असा सवाल नीतेश राणेंनी उपस्थित केला आहे.

    व्हॉट्सअप मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत राणेंनी काँग्रेसवर आरोप केले आहे. यामध्ये नाव अथवा नंबर दिसत नाही. मात्र, भारत जोडो यात्रेत सहभागाविषयी मजकूर दिसून येतोय. त्यावर नीतेश राणेंनी लिहले की, भारत जोडो यात्रेत राहुल गांधींबरोबर चालण्यासाठी कलाकारांना किती पैसे दिले जातात, याचा हा पुरावा. सब गोलमाल है भाई… हा पप्पू कधी पास नाही होणार, असा टोला लगावला आहे.