
एनजीओनी येथील जनतेची माथी भडकावत पुन्हा याठिकाणी विरोध केला व पुन्हा हा जगातील सर्वात मोठा प्रकल्प रखडला.
नितीश राणे – नाणार गाव वगळुन रिफायनरी प्रकल्पसह मार्गी लागेल अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथे दिली आहे. एका वृत्तवाहीनीशी बातचित करताना ही माहिती त्यांनी दिली आहे. बारसु परिसरासह नाणार परिसरातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. केंद्रशासनाचा प्रस्तावीत ग्रीन रिफायनरी प्रकल्पावरुन गेल्या सात वर्षात पर्यावरण आणि इतर मुद्याच्या अनुषंगाने काही एनजीओच्या नेतृत्वात येथील स्थानिकांनी विरोधाची भुमिका घेत आंदोलने केली होती. प्रारंभी नाणार येथे होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प स्थानिकांच्या व शिवसेनेच्या प्रखर विरोधामुळे नाणार येथील जमिन अधिग्रहणाच्या आदेशाला रद्द केल्यामुळे गुंडाळावा लागला होता .
नितीश राणे – नाणार गाव वगळुन रिफायनरी प्रकल्प बारसुसह मार्गी लागेल अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथे दिली आहे. एका वृत्तवाहीनीशी बातचित करताना ही माहिती त्यांनी दिली आहे. बारसु परिसरासह नाणार परिसरातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. केंद्रशासनाचा प्रस्तावीत ग्रीन रिफायनरी प्रकल्पावरुन गेल्या सात वर्षात पर्यावरण आणि इतर मुद्याच्या अनुषंगाने काही एनजीओच्या नेतृत्वात येथील स्थानिकांनी विरोधाची भुमिका घेत आंदोलने केली होती. प्रारंभी नाणार येथे होऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प स्थानिकांच्या व शिवसेनेच्या प्रखर विरोधामुळे नाणार येथील जमिन अधिग्रहणाच्या आदेशाला रद्द केल्यामुळे गुंडाळावा लागला होता .
त्यानंतर महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हा प्रकल्प बारसु येथे होण्यासाठी केंद्र शासनाशी पत्रव्यवहार केल्याने रिफायनरी प्रकल्पाचा मोर्चा बारसुकडे वळला. मात्र येथेही त्याच एनजीओनी येथील जनतेची माथी भडकावत पुन्हा याठिकाणी विरोध केला व पुन्हा हा जगातील सर्वात मोठा प्रकल्प रखडला. त्यानंतर झालेल्या राजकीय उअलथापालथीनंतर राज्यात महायुतीचे शासन आल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यानी बारसु येथे रिफायनरीसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली. याच वेळी पुन्हा नाणार परिसरातील जनतेने आम्हाला रिफायनरी प्रकल्प हवा आहे त्यामुळे तो नाणार वगळुन आजुबाजुच्या गावात उभारण्याची मागणी लावुन धरली. त्यामुळे आता प्रकल्प नेमका कुठे होणार ? राजापूरात होणार की बाहेर जाणार अशा चर्चाना आता उधाण आले आहे.
बारसु परिसरात रिफायनरी मार्गी लावण्यासाठी सत्तेत असताना पत्र देणारी शिवसेना सत्ता जाताच पुन्हा बारसु रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात उभी राहिल्याने रिफायनरी प्रकल्प म्हणजे राजकीय आखाडा झाल्याच्या चर्चा होत होत्या. सात वर्षानंतर आता रिफायनरी प्रकल्पासाठी नाणार व बारसु या दोन्ही ठिकाणाहून प्रकल्पाची मागणी होऊ लागली असताना रिफायनरी प्रकल्पाचे भवितव्य अंधारमय झालेले असतानाच आता भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी कोंकणासह राज्याच्या विकासाला गती मिळवून देणारा रिफायनरी प्रकल्प बारसुसह नाणार पतिसरातच होइल असे वक्तव्य केल्याने राजापूर तालुक्यातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.