नितेश राणे यांचे विरोधकांवर टीकास्त्र, सुप्रिया सुळे यांनी थोडा द्वेषाचा चश्मा बाजूला काढावा – नितेश राणे

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला जाऊन प्रश्न विचारण्याचा अधिकार मला देखील आहे.

    नितेश राणे : आज आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, आज महाराष्ट्र सरकारची मराठवाडा येथे कॅबिनेट होत आहे. मराठा वाड्याला भरभरून देण्याचं काम आमचं सरकार करेल. ह्या सगळ्या गोष्टीला पणवती लावण्याच काम उबाठा सेना करत आहे. हॉटेल व्यावसायिकांच भल होत आहे हे ह्यांना बघवत नाही म्हणून खर्चावर बोलत आहेत. राऊतचा मालक आणि मुलगा ह्यांनी केलेला खर्च नेमका कोणाचा होता? अशी टीका नितेश राणे यांनी संजय राऊतांवर केली आहे.

    पुढे ते म्हणाले, विकास आघाडी असताना हे सरकारच्या पैशावर जगले आणि आता आमचं सरकार मराठवाड्यासाठी काय करत असेल तर हे काळ्या मांजरीसारखे आडवे आले आहेत. मी पण आमच्या संपादकाला घेऊन उद्धव ठाकरेंच्या प्रेसला जाणार आहे. सत्ता असताना डिनो मोर्या खांदयावर आणि विरोधात असताना शेतकऱ्यांच्या बांधावर अशी आदित्य ठाकरेंची अवस्था आहे. मराठवाड्या प्रमाणे कोकणात ही कॅबिनेट व्हावी असे नितेश राणे म्हणाले.

    पुढे नितेश राणे म्हणाले, खासदारकी साठी इच्छुक असणे चुकीचं नाही. रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदार संघात भाजपच्या मदतीशिवाय निवडून येणं शक्य नाही. भाजपचा खासदार असावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, निर्णय वरिष्ठ घेतील. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला जाऊन प्रश्न विचारण्याचा अधिकार मला देखील आहे. मग त्यांचा थयथयाट करायचा नाही. गणेशोत्सव काळात चिपी विमानसेवा विस्कळीत झालेली अशी घटना घडू नये म्हणून आम्ही प्रयत्न करू. शिंदे जवळ धनुष्यबाण आणि शिवसेना नाव कायम राहील. सुप्रिया सुळे यांनी थोडा द्वेषाचा चश्मा बाजूला काढावा अशी टीका विरोधकांवर केली आहे.