‘अखेर सत्य बाहेर येतयं…सुशांतच्या मृतदेहाचा VIDEO ट्विट करत नितेश राणेंचा ‘यानां’ टोला

नितेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्वीट करत म्हण्टलंय की,"रुपकुमार शाह सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह घेऊन जात होते, हे स्पष्ट दिसत आहे. त्याच्या शवविच्छेदनाच्या वेळीही शाह तिथे उपस्थित होते.

  मुबंई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushantsingh Rajput) मृत्यू प्रकरण आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलं आहे. या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची पैज लागलेली असताना आता भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी नुकताच यासंदर्भात एक व्हिडिओ (Video) शेअर केला आहे. सुशांतसिंह राजपूतचा मृतदेह पोस्टमॉर्टेमला नेला जात असतानाचा हा व्हिडिओ असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एव्ढेच नव्हे तर यात तो मृतदेह घेऊन जाणारे रुपकुमार शाह दिसत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

  काय म्हणाले नितेश राणे?

  नितेश राणे यांनी हा व्हिडिओ ट्वीट करत म्हण्टलंय की,”रुपकुमार शाह सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह घेऊन जात होते, हे स्पष्ट दिसत आहे. त्याच्या शवविच्छेदनाच्या वेळीही शाह तिथे उपस्थित होते. सत्य आता समोर येत आहे. आता बेबी पेंग्विन फार लांब नाही. न्याय होणारच.”

  नितेश राणे यांच ट्विट

  काय म्हणाले होते रुपकुमार शाहा?

  मुंबईमधील कूपर रुग्णालयाचे कर्मचारी रुपकुमार शाहा यांनी म्हण्टलं की, जेव्हा सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह पाहिला तेव्हा मला हे आत्महत्या केली नसल्याचं वाटलं. त्यांच्या शरिरावर दुखापतीचे व्रण होते. मी ही बाब माझ्या सिनिअरला सांगितली. मात्र यावर आपण पुन्हा चर्चा करुयात, असे त्यांनी सांगितलं.’  अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनानंतर अडीच वर्षानंतर रूपकुमार शाह यांनी केलेल्या दाव्यानंतर आता खळबळ माजली आहे. सुशांत सिंह यांचं पोस्टमार्टम झालं, तेव्हा ते उपस्थित होते असा दावाही त्यांनी केला होता.

  दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशी

  दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरुनही हिवाळी अधिवेशनात चांगलाच गोंधळ झाला. यावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यता आल्या. दरम्यान दिशाच्या मृत्यूप्रकरणी शिंदे गट आणि भाजपातील आमदारांनी चौकशीची मागणी केली. या  मागणीनंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत ( एसआयटी ) चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली.