गुजरात पोलिसांकडून बळजबरीनं इंजेक्शन देण्याचा प्रयत्न, स्वगृही परतलेल्या नितीन देशमुखांचा आरोप

तुम्हाला अटॅक आला आहे, उपचार करायचे आहेत असं सांगून तिथल्या पोलिसांनी मला उचलून जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेलं. मला अटॅक आला नव्हता. बीपी सुद्धा वाढला नव्हता. असं नितीन देशमुखांनी सांगितलं.

    नागपूर : महाराष्ट्रतून व्हाया गुजरातला पोहोचलेले अकोल्यातील बाळापूचे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) अकोला जिल्ह्यातील शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख महाराष्ट्रात परतले आहेत. मी उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि शिवसेनेतच राहणार, अशी प्रतिक्रिया नितीन देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

    बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या ४० हून अधिक आमदारांचा मुक्काम सूरतमधील हॉटेलमध्ये होता. या आमदारांसोबत बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचाही समावेश होता. परंतु काही शिवसेना आमदारांना जबरदस्तीने, मारुन मुटकून सूरतला नेल्याचा दावा शिवसेनेतर्फे करण्यात आला होता. शिवाय नितीन देशमुख यांचा फोन नॉट रिचेबल आल्याने त्यांच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे नितीन देशमुख यांच्याबाबत नेमकं काय घडलं याची चर्चा सुरु झाली. अखेर नागपुरात परतल्यानंतर त्यांनी आपबिती सांगितली.

    जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेऊन दंडात इंजेक्शन टोचलं

    याबाबत बोलताना नितीन देशमुख म्हणाले की, “माझी तब्येत उत्तम आहे. तुमच्यासमोर मी चांगल्या परिस्थितीत आणि चांगल्या तब्येतीत उभा आहे. हॉटेलमधून 12 वाजता निघालो. तीन वाजता रस्त्यावर उभा होतो. पण 100 ते 200 पोलीस माझ्या मागे होते. कोणत्याही वाहनात मला बसू दिलं जात नव्हतं. तुम्हाला अटॅक आला आहे, उपचार करायचे आहेत असं सांगून तिथल्या पोलिसांनी मला उचलून जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये नेलं. मला अटॅक आला नव्हता. बीपी सुद्धा वाढला नव्हता. त्यामागचा त्यांचा हेतू चुकीचा होता. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर माझ्या दंडात जबरदस्तीने इंजेक्शन टोचले. ते इंजेक्शन कोणतं होतं काय होतं मला माहित नाही. माझ्या शरीरावर चुकीचे उपचार करण्याचं षडयंत्र करायचं होतं. आमचे मंत्री होते म्हणून मी त्यांच्यासोबत गेलो होतो. मी उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि शिवसेनेतच राहणार.