nitin gadkari palkhi road view

संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग - 965 जी) हा 130 किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस - बारामती - इंदापूर - अकलुज - बोंडलेपर्यंत विकसित करण्यात येत आहे.

नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, बारामती: केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देहू (Dehu) व पंढरपूर(Pandharpur) या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची आज खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह हवाई पाहणी (Aerial Inspection) केली.

संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – 965 जी) हा 130 किमी लांबीचा महामार्ग पुणे जिल्ह्यातील पाटस – बारामती – इंदापूर – अकलुज – बोंडलेपर्यंत विकसित करण्यात येत आहे. या मार्गावर एकूण 11 पालखी स्थळे असून वारकऱ्यांच्या सोयीसाठी या सर्व ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

या पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदि सुविधांसह सौंदर्यीकरण करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल.

पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात 57,200 व दोन्ही बाजूस मिळून 18,840 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.