My dream is to run a flying bus in Nagpur - Union Minister Nitin Gadkari

    जर एखाद्या व्यक्तीने रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचा फोटो पाठवला तर त्याला 500 रुपयांचे बक्षीस मिळणार ( Send Wrong Parking Photo Get 500 Rupees ) आहे. सरकार लवकरच तसा कायदा आणणार ( parking rules ) आहे. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्या वाहनधारकाला एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गुरुवारी ही माहिती दिली. येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनांच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायदा आणण्याचा विचार करत आहोत.

    कारण चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर वाहन उभं करणाऱ्यांवर आता मोठी कारवाई केली जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहन उभं केलं असेल तर अशा वाहनाचा फोटो पाठवणाऱ्या नागरिकांना ५०० रुपयांचं बक्षीस मिळेल. तर त्या वाहन चालकाकडून परिवहन विभाग १००० रुपयांचा दंड वसूल करेल. केंद्र सरकार लवकरच असा कायदा (Vehicle Parking Rule) आणणार आहे. चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्या वाहनधारकाला आता मोठा दंड भरावा लागणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी गुरुवारी याबाबतची माहिती दिली.