nmmt bus fire

नवी मुंबई परिवहन उपक्रमाची बस (NMMT Bus Fire) गुरुवारी सकाळी कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने येत होती. खोणी-तळोजा रस्त्यावर बस आली असताना नागझरी गावाजवळील बस थांब्याजवळ बसमधून धूर यायला सुरुवात झाली. चालकाने तात्काळ बस थांबवली आणि त्याने प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले.

    कल्याण : नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाच्या बसला (NMMT Bus Fire) गुरुवारी सकाळी दहा वाजता खोणी-तळोजा रस्त्यावरील (Khoni Taloja Fire) नागझरी बस थांब्याजवळ अचानक आग (Fire News) लागली. यावेळी बसच्या चालकाने प्रसंगावधान राखून प्रवाशांना वेळीच सावध केल्याने जीवितहानी टळली. यावेळी बस आगीत खाक झाली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा संशय अग्निशमन दलाच्या जवानांनी व्यक्त केला आहे.

    नवी मुंबई परिवहन उपक्रमाची बस गुरुवारी सकाळी कल्याण-डोंबिवलीच्या दिशेने येत होती. खोणी-तळोजा रस्त्यावर बस आली असताना नागझरी गावाजवळील बस थांब्याजवळ बसमधून धूर यायला सुरुवात झाली. चालकाने तात्काळ बस थांबवली आणि त्याने प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितले. प्रवासी बसमधून उतरताच बसने पेट घेतला. रस्त्याच्या दोन्ही बाजुला कंपन्या, गोदामे असल्याने काही वेळ या भागात भीतीचे वातावरण पसरले होते.

    सकाळचे वातावरण आणि वारा नसल्याने आगीच्या ज्वाला आजुबाजूला पसऱ्याचं पाहायला मिळालं. काही क्षणात बसच्या चारही बाजुंनी आग लागली. आगीत बस पूर्णपणे भस्मसात झाली. चालकाने तात्काळ याबाबतची माहिती नवी मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांना दिली. नवी मुंबई परिवहन विभागाचे अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी तात्काळ आग विझवली. आगीत बसची आसन व्यवस्था, यंत्रसामुग्री जळून खाक झाली, अशी माहिती परिवहन विभागातील अधिकाऱ्याने दिली आहे.