‘पुरुषोत्तम’चा ऐतिहासिक निकाल, पात्र एकांकिकेअभावी करंडक कोणत्याच संघाला न देण्याचा निर्णय

अभिनय, वाचिक अभिनय आणि दिग्दर्शन (Acting, Vocal Acting and Directing) या विभागांतही पात्र कलाकार (Actor) नसल्याने परीक्षकांनी ही पारितोषिकेही कोणालाही जाहीर केली नाहीत. यंदा सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचे बक्षीसही (Prize) कोणताही पात्र नसल्याने जाहीर करण्यात आले नाही.

    पुणे : स्पर्धेच्या 57 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच मानाच्या पुरुषोत्तम करंडकासाठी (Purushottam Trophy) एकही एकांकिका पात्र न आढळल्याने करंडक (Trophy) कोणत्याच संघाला (Team) न देण्याचा निर्णय परीक्षकांनी घेतला. तसेच, सर्वोत्तम अभिनय, वाचिक अभिनय आणि दिग्दर्शन (Acting, Vocal Acting and Directing) या विभागांतही पात्र कलाकार (Actor) नसल्याने परीक्षकांनी ही पारितोषिकेही कोणालाही जाहीर केली नाहीत. यंदा सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेचे बक्षीसही (Prize) कोणताही पात्र नसल्याने जाहीर करण्यात आले नाही.

    करंडकासाठी पात्र एकांकिका नसली तरी सांघिक प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) या महाविद्यालयाच्या ‘कलिगमन’ या एकांकिकेस जाहीर झाले आहे. या संघास पुरुषोत्तम करंडक मिळणार नसला तरी पाच हजार एक रुपयांचे बक्षीस मिळणार आहे.