काँग्रेस पक्षावर कितीही दबाब आणला तरी आम्ही भाजपला भीक घालत नाही-ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे 

मोदी सरकार च्या चुकीच्या धोरणांचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. यांची नोटा बंदी, जीएसटी व अग्निपथ ह्या सर्व फसव्या योजना आहेत. चारित्र्य संपन्न व्यक्तींना ईडी च्या चौकश्या लावून चारित्र्य हनन केले जात आहे. महागाई, बेरोजगारी व विकास आदी प्रश्न सोडवण्यास मोदी सरकार नापास झाले आहे.

  वडगाव मावळ : मोदी सरकार च्या चुकीच्या धोरणांचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे. यांची नोटा बंदी, जीएसटी व अग्निपथ ह्या सर्व फसव्या योजना आहेत. चारित्र्य संपन्न व्यक्तींना ईडी च्या चौकश्या लावून चारित्र्य हनन केले जात आहे. महागाई, बेरोजगारी व विकास आदी प्रश्न सोडवण्यास मोदी सरकार नापास झाले आहे.काँग्रेस पक्षावर कितीही दबाब आणला तरी आम्ही भाजपला भीक घालत नाही. ८  वर्षात जनतेच्या विकासाचे एकही काम केले नाही सर्व फसव्या योजनांचा मिडीयाच्या माध्यमातून प्रसार केला जात आहे. जनतेला मोदी सरकारच्या फसव्या योजना कळल्याने देशात अनेक राज्यात आंदोलने सुरू आहेत.अशी घणाघाती टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांनी केली.
  महाविकासआघाडी वतीने व मावळ तालुका काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरापासून मावळ तहसील कार्यालयावर सोमवारी (दि.२०) सकाळी ११ वा. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी
  मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले.
  या आंदोलनात शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मोदी सरकारच्या निषेधार्थ तीव्र घोषणा दिल्या.
  याप्रसंगी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, पुणे जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, रोहिदास वाळुंज, सुभाष जाधव, संतोष राक्षे,  सचिन घोटकुले,  चंद्रकांत दाभाडे, विलास मालपोटे, सुनील भोंगाडे, किशोर सातकर,  गजानन शिंदे, नगरसेवक सुनील ढोरे, संदीप आंद्रे, शांताराम लष्करी, दत्तात्रय पडवळ, विजय सातकर, संतोष जांभुळकर, प्रकाश आगळमे, भानुदास जांभुळकर बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
  राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले मोदी सरकारने सहाय्यक संस्थांच्या माध्यमातून वापरलेल्या दबाव तंत्रामुळे देश अस्थिर आहे. शेतकरी, उद्योजक, युवकांसाठी फसव्या योजना राबवून त्या योजना फसव्या असल्याच्या जनतेला समजल्याने त्या मागे घेण्याची वेळ मोदीसरकार वर येते.
  यावेळी ज्येष्ठ नेते यादवेंद्र खळदे, सचिन घोटकुले, किशोर सातकर आदींनी मोदी सरकारच्या निषेधार्थ तीव्र संताप व्यक्त केला.