chchagan bhujbal

मराठा गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना अपशब्द वापरले. त्याला भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गायकवाड यांनी माझ्याबद्दल जे अपशब्द वापरले ते ऐकून वाईट वाटले. त्यांनी भाषा जरा जपून वापरली पाहिजे होती.

    नाशिक : मराठा गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना अपशब्द वापरले. त्याला भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गायकवाड यांनी माझ्याबद्दल जे अपशब्द वापरले ते ऐकून वाईट वाटले. त्यांनी भाषा जरा जपून वापरली पाहिजे होती.

    ते म्हणाले होते की, कमरेत लाथ घालून त्यांना मंत्रिमंडळाबाहेर काढा. मला मंत्रिमंडळाबाहेर काढायचे की ठेवायचे, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. रविवारी नाशिक येथे पत्रकारांशी ना. भुजबळ बोलत होते. या घटनेनंतर भुजबळ यांनी स्वतःच, मी १६ नोव्हेंबर रोजी माझा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिल्याचा गौप्यस्फोट केला. भुजबळ यांनी सांगितले की, मंत्रिमंडळातील मंत्र्यांना भूमिका पटत नसल्याने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून राजीनामा दिला आहे, असे राजीनामा पत्रात म्हटले आहे.

    सरकारकडून मागे घेण्याची विनंती

    गेल्या वर्षी १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केल्याची केल्य माहिती समोर येत आहे. भुजबळ यांनीच ओबीसी एल्गार सभेतून तसा मोठा गौप्यस्फोट केला आहे. यानंतर १८ नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यासंदर्भात बैठक घेतली.

    दरम्यान, त्याच दिवशी शिंदे, फडणवीस, पवार यांच्याकडून हा राजीनामा मागे घेण्याची विनंती करण्यात आली. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे राजीनामा मागे घ्यावा, अशी विनंती सरकारकडून करण्यात आल्याचे भुजबळ म्हणाले.