कोणी गृहीत धरु नये; राजू पाटील यांचे सूचक वक्तव्य

लोकशाहीत मतदान हे पवित्र कर्तव्य आहे. एका मताचे किती महत्त्व असते हे मागे राज्यसभेच्या निवडणुकीत पाहिले. राज साहेबांना रात्री हॉस्पिटलला भेटायला गेलो होतो. त्यांनी मला निर्देश दिल्याप्रमाणे मतदान होईल, असे राजू पाटील यांनी स्पष्ट केले.

    राज्यसभेच्या मतदानावेळी मनसेचे (MNS) एकमेव आमदार असलेले राजू पाटील (Raju Patil) चर्चेत आहेत. त्यांचे मत भाजपला (BJP) गेल्याची खूप चर्चा होती. मात्र, विधानपरिषदेच्या मतदानाबाबत (MLC ELection) मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सस्पेन्स (Suspence) निर्माण केला आहे. कोणी गृहीत धरु नये, असे त्यांनी सांगितले. मागच्या वेळेस आम्ही व्यक्ती बघून मतदान केले होते. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानुसार आम्ही मतदान केल्याचे राजू पाटील म्हणाले.

    लोकशाहीत मतदान हे पवित्र कर्तव्य आहे. एका मताचे किती महत्त्व असते हे मागे राज्यसभेच्या निवडणुकीत पाहिले. राज साहेबांना रात्री हॉस्पिटलला भेटायला गेलो होतो. त्यांनी मला निर्देश दिल्याप्रमाणे मतदान होईल, असे राजू पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळं मनसेचे मत नेमके कोणाला याचा सस्पेन्स कायम आहे. हे एकमेव मत खूप महत्वाचे आहे. मागच्या वेळेस आम्ही व्यक्ती बघून मतदान केले होत असे राजू पाटील यांनी सांगितले.

    राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरु राहणार का, हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. एकूण १० जागांसाठी सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी ५ वाजता सुरु होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर, भाजपने या निवडणुकीतही चमत्कार करुन दाखवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.