एकनाथ शिंदेंकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही, जे होतं ते चांगल्यासाठीच – चंद्रकांत पाटील

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद (Chandrakant Patil press conference) घेत आपली प्रतिक्रिया दिली. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. एकनाथ शिंदेंनी जर सत्तास्थापनेचा प्रस्ताव भाजपाला दिला तर आम्ही त्याचे स्वागतच करु, दरम्यान, भाजपाला ज्यांनी मतदान केले त्यांचे मनापासून आभार, राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीमुळं अपक्षांचे महत्त्व आणि वर्चस्व वाढलं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

    मुंबई : सोमवारी विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) पार पडली. मविआ (BJP and MVA) या दोघांमध्ये अंत्यत चुरशीची लढत पाहायला मिळाली. भाजपाचे पाचपैकी पाचही उमेदवार जिंकून आले आहेत. तर मविआचे सहापैकी पाच उमेदवार जिंकले असून, एक उमेदवार म्हणजे चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीत मविआच्या पराभवानंतर मविआमध्ये चलबिचलता तसेच सरकार अस्थिर होण्याची भीती व्यक्त केली जात असून, राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे.

    दरम्यान, एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडावरुन आता राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावर आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद (Chandrakant Patil press conference) घेत आपली प्रतिक्रिया दिली. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. एकनाथ शिंदेंनी जर सत्तास्थापनेचा प्रस्ताव भाजपाला दिला तर आम्ही त्याचे स्वागतच करु, दरम्यान, भाजपाला ज्यांनी मतदान केले त्यांचे मनापासून आभार, राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीमुळं अपक्षांचे महत्त्व आणि वर्चस्व वाढलं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

    आपण काही शिंदेंना प्रस्ताव पाठवला आहे का असं पाटील यांना पत्रकार परिषदेत विचारता, आम्ही एकनाथ शिंदेंना कोणताही प्रस्ताव दिला नाही किंवा त्यांनीही आम्हाला कुठलाही प्रस्ताव दिला नाही. पण त्यांनी वेगळी वाट निवडली आहे. त्यांचं पुढे काय होईल, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर भाजप भाजप वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे, असं पाटील म्हणाले. पुढे काय होईल ते पाहता येईल असं पाटील यावेळी म्हणाले.