प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

शहरातील सर्व उत्पादक, स्टॉकिस्ट, किरकोळ विक्रेते, दुकानदार, ई-कॉमर्स कंपन्या, रस्त्यावरील विक्रेते, व्यावसायिक आस्थापने , मॉल्स, बाजारपेठे, शॉपिंग सेंटर , चित्रपटगृहे, पर्यटन ठिकाणे, यांच्यासह शाळा, महाविद्यालये, कार्यालयीन ठिकाणे, रुग्णालये आणि इतर संस्था आणि सामान्य जनतेने बंदी असलेल्या प्लॅस्टिकचे उत्पादन, साठवणूक, पुरवठा, विक्री, वाहतूक, वितरण किंवा वापर त्वरीत बंद करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

    पुणे : शहरातील सर्व उत्पादक, स्टॉकिस्ट, किरकोळ विक्रेते, दुकानदार, ई-कॉमर्स कंपन्या, रस्त्यावरील विक्रेते, व्यावसायिक आस्थापने , मॉल्स, बाजारपेठे, शॉपिंग सेंटर , चित्रपटगृहे, पर्यटन ठिकाणे, यांच्यासह शाळा, महाविद्यालये, कार्यालयीन ठिकाणे, रुग्णालये आणि इतर संस्था आणि सामान्य जनतेने बंदी असलेल्या प्लॅस्टिकचे उत्पादन, साठवणूक, पुरवठा, विक्री, वाहतूक, वितरण किंवा वापर त्वरीत बंद करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

    कॅरीबॅग्ज (७५ मायक्रोनपेक्षा कमी), विघटनशील नसलेले प्लॅस्टिक (झेंडे, प्लेट्स, चहा कप, पाण्याचे पाऊच, स्ट्रॉ इ.) नॉन वॉवन बॅग्ज, स्टायरोफोम, थर्माकोल, पत्रकांची आवरणे, वेष्टने असलेल्या वस्तू. प्लॅस्टिकच्या काड्या असलेले इअरबड्स, फुग्यासाठी वापण्यात येणाऱ्या काड्या, कॅंडी स्टिक्स, आइस्क्रीम स्टिक्स, सजावटीसाठीचे पॉलिस्टीरिन; ग्लासेस. काटेचमचे, चाकू, मिठाईचे बॉक्स, निमंत्रण पत्रिका आणि सिगारेटची पाकिटे गुंडाळण्यासाठी वापरलेल्या पॅकिंग फिल्म्स, १०० मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे प्लॅस्टिक किंवा पीव्हीसी बॅनर यावर प्रशासनाद्वारे बंदी घालण्यात आली आहे.

    पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेनेही शहर परिसरात प्लॅस्टिकला बंदी घातलेली आहे. मात्र, त्यानंतही हे प्लॅस्टिक वापरले जात आहे. त्याच्या कचऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. यावर आता शहरात प्लॅस्टिकबंदी नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.