गादीच्या नावाखाली कापसाऐवजी थर्माकोल टाकून विकायचे परप्रांतीय; मनसे पदाधिकाऱ्यांना मिळाली माहिती अन्…

कापसाच्या गादीच्या नावाखाली थर्माकोलची गादी विकणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलखोल केली. सध्या शहरात अनेक परप्रांतीय गादी विक्रीचा व्यवसाय करत (Nashik News) आहेत. मात्र, या गादीत कापसाऐवजी थर्माकोल टाकून ते विकत असून, ग्राहकांची फसवणूक (Fraud) करत आहेत.

    सिडको : कापसाच्या गादीच्या नावाखाली थर्माकोलची गादी विकणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलखोल केली. सध्या शहरात अनेक परप्रांतीय गादी विक्रीचा व्यवसाय करत (Nashik News) आहेत. मात्र, या गादीत कापसाऐवजी थर्माकोल टाकून ते विकत असून, ग्राहकांची फसवणूक (Fraud) करत आहेत. याबाबत मनसेचे शहर सचिव शंकर कनकुसे, मनसे शहर संघटक अर्जुन वेताळ यांना माहिती मिळाली असता त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला.

    या सर्व गाद्यांमध्ये कापसाऐवजी थर्माकोल भरल्याचे आढळले. याबाबतची चौकशी विक्रेत्याकडे केली असता त्यांनी गाद्यांमध्ये फोम व स्पंज भरले असल्याचे सांगितले. मात्र, मनसे पदाधिकाऱ्यांनी याची पडताळणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीय फेरीवाल्यांकडे आधारकार्डची मागणी केली. मात्र, त्यांनी ते दाखविले नाही. आम्ही उत्तर प्रदेश येथून आलो आहोत, एवढेच सांगितले.

    सदर नागरिक हे बांगलादेशी घुसखोर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी त्यांची कसून चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.