महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही, कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

आज शिर्डीत मुख्यमंत्री झाल्यावर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आले होते. यावेळी त्यांना माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी आमची आहे. कर्नाटकचे (Karnatka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ज्या गावावर दावा केला आहे, ते सांगलीतील जतमधील गावची मागणी ही 2012 सालची आहे.

    शिर्डी – कर्नाटकचे (Karnatka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी एक गाव काय? बेळगाव, कारवार, निपाणीचा एक तुकडा देखील महाराष्ट्राला देणार नाही, उलट सांगलीच्या एका गावावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला आहे, त्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा पेटला आहे. तसेच शिंदे-फडणवीस सरकारवर तसेच केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) टिका केली जात आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया समोर आली आहे.

    आज शिर्डीत मुख्यमंत्री झाल्यावर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आले होते. यावेळी त्यांना माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी आमची आहे. कर्नाटकचे (Karnatka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ज्या गावावर दावा केला आहे, ते सांगलीतील जतमधील गावची मागणी ही 2012 सालची आहे. सीमावाद सामोपचारनं सोडविण्यावर आमची भर आहे, सीमा वादात आणखी कोणी काही वाद निर्माण करु नये, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला. तसेच सध्या सीमा वादाचा प्रश्न न्यायालयीन आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी मंत्री दीपक केसरकर व मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते.