eknath shinde and devendra fadnavis

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ (Cabinet Expansion) विस्तारात एकाही महिला आमदाराचा समावेश नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिंदे सरकारचे मंत्रिमंडळ पुरुषप्रधान असल्याची टीका होत आहे.

    मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM eknath Shinde) यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. शिंदे सरकारमधील १८ मंत्र्यांनी आज राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली. भाजप आणि शिंदे गटाकडून  अनेक ज्येष्ठ नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. पण शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला आमदाराचा समावेश नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिंदे सरकारचे मंत्रिमंडळ पुरुषप्रधान असल्याची टीका होत आहे.

    मंत्र्यांच्या शपथविधीपूर्वी शिंदे-फडणवीस गटातील काही महिला आमदारांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिले जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र मंत्र्यांच्या अंतिम यादीमध्ये एकाही महिला आमदाराचं नाव नव्हतं. शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण १८ आमदारांना मंत्रिमंडळांत स्थान देण्यात आले आहे. यात शिंदे गटातील ९ आणि भाजपच्या ९ जणांचा समावेश आहे. या १८ जणांमध्ये एकाही महिला आमदार नसल्याचे दिसत आहे.

    शिंदे गटातील ९ मंत्र्यांची यादी – तानाजी सावंत (Tanaji Sawant), उदय सामंत (Uday Samant), संदीपान भुमरे (Sandipan Bhumre), दादा भुसे (Dada Bhuse), अब्दुल सत्तार (Abdul Sattar)
    दीपक केसरकर (Deepak Kesarkar), शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), संजय राठोड (Sanjay Rathod), गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)

    भाजपच्या ९ मंत्र्यांची यादी – गिरीश महाजन (Girish Mahajan), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar), सुरेश खाडे (Suresh Khade), राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil), अतुल सावे (Atul Save), रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan), विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit), मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha)