लग्न नव्हे ‘पश्चाताप दिन’ साजरा करण्यासाठी सुट्टी द्या, पोलीस कर्मचाऱ्यानं केला अजब अर्ज

विनोद राठोड याचा 29 मार्च रोजी लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे 27 मार्चची साप्ताहिक रजा 29 मार्चला बदली करून द्यावी, अशी विनंती करत वरिष्ठाकडे अर्ज केला. हा अर्ज मात्र आता चर्चेचा विषय ठरू लागला आहे. कारण लग्नाचा वाढदिवसाला या पोलीस अमलदाराने चक्क पश्चाताप दिवस म्हणून उल्लेख करत सुट्टी मागतली आहे. 

    अमरावती : कधी पोलीस विभागात काम करणारे कर्मचारी कधी गाताना तर कधी डान्स करतानाही यापुर्वी चर्चेत आलेेले आपण पाहिले आहे. मात्र आता यावेळी एखाजा पोलिस कर्मचारी त्याच्या कोणत्या कलेमुळे नाही तर सुट्टीसाठी केलेल्या अजब अर्जामुळे चर्चेत आला आहे. विनोद राठोड (Vinod Rathod) असं या पोलीस अमलदारानं सुटीसाठी अर्ज केला. विशेष म्हणजे सुट्टीसाठी हव्या असलेल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या कारणासमोर (Reasons for Wedding anniverssary) कंसात पश्चाताप दिन असा उल्लेख केला. अर्जाची ही प्रत आता सर्वत्र व्हायरल होतंय. पोलीस दलासह सर्वत्र या विनंती अर्जाची चर्चा होत आहे.

    काय होतं अर्जात

    विनोद राठोड याचा 29 मार्च रोजी लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे 27 मार्चची साप्ताहिक रजा 29 मार्चला बदली करून द्यावी, अशी विनंती करत वरिष्ठाकडे अर्ज केला. हा अर्ज मात्र आता चर्चेचा विषय ठरू लागला आहे. कारण लग्नाचा वाढदिवसाला या पोलीस अमलदाराने चक्क पश्चाताप दिवस म्हणून उल्लेख करत सुट्टी मागतली आहे.  आणि तो दिवस साजरा करण्यासाठी या पोलिसाने अर्ज केला आहे. हा अर्ज पाहून पोलीस अधिकारी ही चक्रावून गेले होते. या अर्जची आता सगळीकडे चर्चा होऊ लागली आहे.