देहू येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान – खासदार सुप्रिया सुळे

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाच भाषणापासून डावलण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे हातवारे करून बोलण्याबाबत इशारा केला. मात्र तरीही संस्थानकडून उपमुख्यमंत्री पवारांना बोलू दिले नाही. यावर आता विविध तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. उपमुख्यमंत्र्यांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची टिका खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) केली आहे.

    देहू : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हस्ते देहूत (Dehu) शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. मावळ तालुक्यातील इंद्रायणीतीरावरील (Maval Indrayani) श्री. क्षेत्र देहूनगरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच आले होते. त्यानंतर पंतप्रधान मोदी वारकऱ्यांशी संवाद साधला. तुकोबारायांची शिळा (Tukaram maharaj Sheela) ही भक्ती आणि आधाराचं केंद्र आहे. संत तुकाराम महाराज यांचे अभंग अनेक पिढ्यांचे मार्गदर्शक आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या आयुष्यात संत तुकाराम महाराज यांची महत्त्वाची भूमिका असल्याचं मोदी यांनी म्हटले. सोहळ्याला येण्यास मिळणे हे माझे भाग्य असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं. पण तत्पूर्वी अजित पवारांना बोलू का दिलं नाही यावरुन वातावरण तापलं आहे.

    दरम्यान, या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) बोलू का दिलं नाही, यावरुन वातावरण तापलं आहे. नितीन महाराज मोरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Nitin More maharaj and devendra fadnvis) यांची भाषणे झाली. मात्र पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाच भाषणापासून डावलण्यात आले. कार्यक्रमा दरम्यान खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे हातवारे करून बोलण्याबाबत इशारा केला. मात्र तरीही संस्थानकडून उपमुख्यमंत्री पवारांना बोलू दिले नाही. यावर आता विविध तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. उपमुख्यमंत्र्यांना बोलू न देणं हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची टिका खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) केली आहे.

    पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांचे भाषण होणे अपेक्षित होते. मात्र सुत्रसंचालकाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना भाषणासाठी आमंत्रित केले. दरम्यान, अजित पवारांना भाषण का करु दिले नाही, याबाबत वारक-यामध्ये चर्चा रंगली आहे. तसेच उलट सुलट तर्क वितर्क लढविले जात आहेत. अजितदादांना न बोलू दिल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते संस्थांनवर नाराजीचा सूर ओढत आहेत. तसेच यावर आता विविध तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.