eknath shinde and uddhav thackeray

कायद्यानुसार पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो. मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांना गटनेता म्हणून घोषित केले असून तशा आशयाचे पत्रही दिले आहे. प्रतोद नेमण्याची जबाबदारी गटनेत्याकडे असते. शिंदेंकडून आलेले पत्र मी पाहिलेले नाही, ते पाहून त्यावर विचार करुन प्रतोद आणि गटनेता कोण याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे विधानसभेचे उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले(Not Eknath Shinde but Ajay Chaudhary announced by Uddhav Thackeray).

    मुंबई : कायद्यानुसार पक्षप्रमुखाने गटनेता नेमायचा असतो. मुख्यमंत्री तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याऐवजी अजय चौधरी यांना गटनेता म्हणून घोषित केले असून तशा आशयाचे पत्रही दिले आहे. प्रतोद नेमण्याची जबाबदारी गटनेत्याकडे असते. शिंदेंकडून आलेले पत्र मी पाहिलेले नाही, ते पाहून त्यावर विचार करुन प्रतोद आणि गटनेता कोण याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे विधानसभेचे उपाध्यक्ष तथा प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले(Not Eknath Shinde but Ajay Chaudhary announced by Uddhav Thackeray).

    नितीन देशमुख यांनी सांगितले आहे की माझी सही इंग्रजीत आहे आणि पत्रावरील सही मराठीत आहे. त्यामुळे माझी सही ग्राह्य धरु नये. त्यामुळे मी ते तपासून घेणार आहे. त्यानंतर निर्णय घेऊ.

    शिंदे यांच्याकडून गटनेता म्हणून जे पत्र देण्यात आलेले आहे, यामध्ये अपक्ष आमदारांच्याही सह्या आहेत. तसेच देशमुख यांच्या आक्षेपामुळे पत्रावर शंका निर्माण झाली आहे.सर्व बाबी तपासल्यानंतरच निर्णय घेऊ असे नरहरी झिरवळ म्हणाले.