अजितदादांसारखे माझे नाही, गंगेचं पाणी सोडून गटारीचे पाणी प्यायला जाणे; उत्तमराव जानकरांची अजित पवारांवर टीका

सध्या राज्यातील राजकीय (Loksabha Election) हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षातील नेत्यांची जोरदार तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका कोणाचा विजय होणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.

    सध्या राज्यातील राजकीय (Loksabha Election) हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षातील नेत्यांची जोरदार तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका कोणाचा विजय होणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सुरु असलेला राजकीय कलह थांबण्याचे नाव घेत नाही. अशातच उत्तमराव जानकरांनी ( (Uttam jankar)) अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

    गुरूच्या नंतर सभा करायची नसते, म्हणून नरेंद्र मोदी शरद पवारांच्या आधी सभा करून गेले. गेल्यावेळी चुकी केली म्हणून माढा जिंकून प्रायश्चित करणार आहेत. विठ्ठल आमची काळजी घेईल तोही आमचा देव आहे. तुमच्या पक्षात असताना राम आणि आता तो दहशतवादी, असे म्हणत उत्तमराव जानकरांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. ७७ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टांचार केलेल्यांना चुना लावून बगळा केला आहे, असे देखील जानकर अजित पवारांना म्हणाले. संघर्ष करणे हे माझ्या रक्तात आहे. अजित पवारांसारखे माझे नाही गंगेचं पाणी सोडून गटारीचे पाणी प्यायला गेले. वाचले तर फक्त गडकरी नाहीतर सगळं सुफडा साफ होणार आहे. सब कुच जल गया अब बाचा क्या है, असे म्हणत उत्तमराव जानकरांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

    माढा लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सभा घेणार आहेत. तसेच त्यांच्या सभेसाठी जयंत पाटील, राजेश टोपे, बाबासाहेब देशमुख तसेच भूषणसिंह होळकर उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांच्यासह इतर नेत्यांनी देखील कंबर कसली आहे.राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे घोषित केल्यानंतर राज ठाकरे यांची सभा झाली आहे.