नॉट रिचेबल एकनाथ शिंदे सुरतमध्ये दुपारी १ वाजता घेणार पत्रकार परिषद घेण्याची शक्यता

शिवसेनेतून १३ पेक्षा जास्त आमदार फुटू शकतात, अशी भीती राजकीय जाणकारांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळं राज्याच्या राजकारण राजकीय भूकंप होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, ठाकरे सरकार डेझर झोनमध्ये आले असल्याचं बोललं जात आहे. या सर्व घडामोंडीनंतर मंत्री एकनाथ शिंदे सुरतमध्ये दुपारी १ वाजता घेणार पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. नाराज शिंदे हे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं बोललं जात आहे.

    मुंबई : सोमवारी विधान परिषद निवडणूक (MLC Election 2022) पार पडल्या. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार (MLC Election 10 seat) रिंगणात उतरले होते. दहाव्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये (Congress and BJP) लढत रंगली होती. भाजपा व मविआ (BJP and MVA) या दोघांनी एक एक मतांसाठी अपक्षांची मनधरणी केल्याचे पाहयला मिळाले. दरम्यान, भाजपाचे पाचपैकी पाचही उमेदवार जिंकून आले आहेत. तर मविआचे सहापैकी पाच उमेदवार जिंकले असून, एक उमेदवार म्हणजे चंद्रकांत हंडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीत मविआच्या पराभवानंतर आता ठाकरे सरकारला हादरे बसायला सुरुवात झाली आहे.

    दरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या १३ समर्थक आमदारांसह नॉट रिचेबल आहेत. शिंदे हे आपल्या गटातील आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरत (Gujrat surat) येथे एका हॉटेलमध्ये मुक्कामाला असल्याची माहिती आहे. शिवसेनेतून १३ पेक्षा जास्त आमदार (Shivsena 13 MLA) फुटू शकतात, अशी भीती राजकीय जाणकारांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळं राज्याच्या राजकारण राजकीय भूकंप होणार असल्याची भीती व्यक्त केली जात असून, ठाकरे सरकार डेझर झोनमध्ये आले असल्याचं बोललं जात आहे. या सर्व घडामोंडीनंतर मंत्री एकनाथ शिंदे सुरतमध्ये दुपारी १ वाजता घेणार पत्रकार परिषद (Press Conference) घेण्याची शक्यता आहे. नाराज शिंदे हे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं बोललं जात आहे.

    दरम्यान, अशा परिस्थितीत महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Sharad Pawar) यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पवार सध्या दिल्लीत आहेत. त्यामुळं राज्यात नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच ठाण्यातील अनेक जुने शिवसैनिक व शिवसेना समर्थक एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्याचं बोललं जात आहे. अनेक शिवसेना पदाधिकारी यांची सोशल मीडियावर पोस्ट करून एकनाथ शिंदेना समर्थन देत आहेत. साहेब बोलतील तो आदेश अश्या आशयाचे पोस्ट वायरल होत आहेत.